Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

August 14, 2026

‘पुणे–नाशिक रेल्वे संगमनेरमार्गेच व्हावी’; पुण्यात लवकरच विशेष रेल्वे परिषदेचे आयोजन

August 14, 2026

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

August 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं
प्रशासन

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

आता या प्रकरणात सुराणा यांचे निलंबन मागे घेतले जाणार की अन्य काही अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार, याकडे संपूर्ण प्रशासनाचे लक्ष लागून राहिले आहे
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 14, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि गौणखनिज चोरीच्या प्रकरणात मोठी कारवाई करत अमळनेरचे तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांना निलंबित करण्यात आले आहे. गौणखनिज चोरी व अवैध वाहतुकीवर रोख लावण्यात निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा दाखवल्याचा ठपका ठेवत महसूल व वन विभागाने हे निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. 

या कारवाईमुळे संपूर्ण महसूल विभागात तीव्र खळबळ उडाली असून, चौकशीअंती आणखी एका तहसीलदारावर कारवाई प्रस्तावित असल्याची चर्चा रंगल्याने इतर अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.

हे संपूर्ण प्रकरण सावखेडा येथील वाळू घाटाशी संबंधित आहे. २६ मे रोजी या घाटावर नियमबाह्य पद्धतीने मशीनद्वारे मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा सुरू असल्याचे महसूल व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत उघडकीस आले होते. गौणखनिज उत्खननाच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होताच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सुरुवातीला सावखेडा येथील मंडळाधिकारी कल्याणी पाटील आणि तलाठी पवनकुमार शिंगारे यांना तत्काळ निलंबित केले होते.

या प्रकरणाच्या सखोल चौकशीची जबाबदारी अमळनेरचे प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यांनी आपला चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केल्यानंतर मिळालेल्या निष्कर्षांच्या आधारे गुरुवारी तहसीलदार सुराणा यांच्या निलंबनाचे अधिकृत आदेश प्रशासनाला प्राप्त झाले.

दुसरीकडे, या कारवाईविरोधात महसूल अधिकारी संघटना आक्रमक झाली असून ती तहसीलदार सुराणा यांच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. सुराणा यांनी अवैध वाळू उपशाविरोधात सातत्याने कारवाया केल्याचे पुरावे उपलब्ध असून, त्यांच्यावर केलेली ही कारवाई एकतर्फी व अन्यायकारक असल्याचा दावा संघटनेने केला आहे. सुराणा यांना सुनावणीची योग्य संधी देऊन त्यांचे निलंबन तत्काळ मागे घ्यावे आणि त्यांची अमळनेर येथे पुनर्नियुक्ती करावी, अशी मागणी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महसूल विभागाच्या अपर सचिवांकडे पत्राद्वारे केली आहे.

आता या प्रकरणात सुराणा यांचे निलंबन मागे घेतले जाणार की अन्य काही अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार, याकडे संपूर्ण प्रशासनाचे लक्ष लागून राहिले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 254
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

August 12, 2026

डॉ. मीरा ढास यांनी शिर्डी उप माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला

August 4, 2026

अहिल्यानगरला ‘या’ नव्या अधिकाऱ्यांनी स्वीकारला जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार

August 3, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

By अनंत पांगारकरAugust 14, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि गौणखनिज चोरीच्या प्रकरणात मोठी कारवाई करत…

‘पुणे–नाशिक रेल्वे संगमनेरमार्गेच व्हावी’; पुण्यात लवकरच विशेष रेल्वे परिषदेचे आयोजन

August 14, 2026

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

August 14, 2026

लावणीचा युवक महोत्सवात लोकनृत्य म्हणून समावेश करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार : पद्मश्री रघुवीर खेडकर

August 14, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.