Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

सुफियाना सुरावटींनी संगमनेरकर रसिक मंत्रमुग्ध; ‘सजदा’ सोहळ्याने संगमनेर फेस्टिव्हलची रंगली तिसरी संध्याकाळ

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीचा फुसका बार; वंचितच्या उत्कर्षा रूपवते यांचा थेट हल्लाबोल
राजकारण

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीचा फुसका बार; वंचितच्या उत्कर्षा रूपवते यांचा थेट हल्लाबोल

'ऑपरेशन टायगर' सारख्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांचे नाव सातत्याने पुढे येत असले, तरी शिर्डी लोकसभेचा एकही प्रलंबित किंवा महत्त्वाचा प्रश्न त्यांनी संसदेत आक्रमकपणे मांडला नाही
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/06/2026Updated:16/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
मुंबई:
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेने ज्या अपेक्षेने आणि विश्वासाने त्यांना निवडून दिले, त्या अपेक्षांची पूर्तता करण्यात खासदार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी केला आहे.
रूपवते यांनी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या गेल्या दोन वर्षांतील कारकिर्दीवर थेट आणि धारदार शब्दांत टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत खासदार वाकचौरे यांच्या कामगिरीचा जाहीर पंचनामा केला.
उत्कर्षा रूपवते म्हणाल्या की, ४ जून रोजी लोकसभेच्या निकालाला दोन वर्षे पूर्ण झाली असून या काळात खासदारांनी मतदारसंघात नेमकी काय कामे केली आणि कोणत्या विकासकामांना गती दिली, याचा लेखाजोखा त्यांनी जनतेसमोर मांडणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीही घडलेले दिसत नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाऊसाहेब वाकचौरे यांनी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, त्यात अनेक मोठी आश्वासने देण्यात आली होती.
या जाहीरनाम्यातील कोणती कामे कुठपर्यंत आली, यावर खासदारांनी किंवा त्यांच्या टीमने जाहीरपणे आपली भूमिका मांडायला हवी होती. पाच वर्षांच्या कार्यकाळात सर्वच कामे पूर्ण होऊ शकत नाहीत आणि कोणाकडेही जादूची काडी नाही, हे आम्हालाही समजते, पण किमान जनतेसमोर येऊन आपल्या कामाची वस्तूस्थिती मांडणे हे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे कर्तव्य होते, ज्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.
विरोधी पक्षातील इतर खासदार ज्याप्रमाणे भाजप आणि आरएसएसच्या विचारसरणीच्या विरोधात आणि विविध सामाजिक प्रश्नांवर आपली भूमिका ठामपणे मांडत आहेत, तशी कोणतीही ठोस भूमिका शिर्डीच्या खासदारांनी घेतलेली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. लोकसभेमध्ये महिलांवर होणारे अन्याय-अत्याचार असो किंवा दलितांचे प्रश्न, या कोणत्याही ज्वलंत विषयावर खासदारांनी आवाज उठवला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
‘ऑपरेशन टायगर’ सारख्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांचे नाव सातत्याने पुढे येत असले, तरी शिर्डी लोकसभेचा एकही प्रलंबित किंवा महत्त्वाचा प्रश्न त्यांनी संसदेत आक्रमकपणे मांडला नाही अथवा त्यासाठी संघर्ष केला नाही, ही मतदारसंघासाठी मोठी शोकांतिका असल्याचे रूपवते यांनी म्हटले आहे.
खासदारांचा अजून तीन वर्षांचा कार्यकाळ बाकी असून त्यांनी राजकीय उलथापालथींमध्ये न गुंतता, ज्या जनतेने त्यांना निवडून दिले आहे त्यांच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करावे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 559
उत्कर्षा रुपवते भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी लोकसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – पारदर्शक कामकाज आणि गुणवत्तेच्या जोरावर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी…

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

सुफियाना सुरावटींनी संगमनेरकर रसिक मंत्रमुग्ध; ‘सजदा’ सोहळ्याने संगमनेर फेस्टिव्हलची रंगली तिसरी संध्याकाळ

19/09/2026

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.