Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

07/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

आज सोमवार, ०७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

07/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने
राजकारण

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

शुक्रवारी मुंबईत शिवतीर्थावर होणाऱ्या मुख्य आंदोलनासोबतच राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निदर्शने केली जाणार आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

NEET पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. दिल्लीतील या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ शुक्रवारी २४ जुलै रोजी महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईतील ऐतिहासिक शिवतीर्थासह (शिवाजी पार्क) संपूर्ण राज्यभरात तीव्र आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या एकत्रित आंदोलनात आघाडीचे सर्व प्रमुख घटकपक्ष पूर्ण ताकदीने सहभागी होणार असल्याने राज्यभरात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

दिल्लीत विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना झालेल्या बेदम मारहाणीचे फोटो आणि बातम्या सोशल मीडियावर पसरल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या लाठीमारात मुंबई, पुणे आणि नागपूरसह महाराष्ट्रातील अनेक मराठी तरुण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आधीच मुंबईत शिवसेना आणि मनसेने शिवाजी पार्कवर, काँग्रेसने चेंबूरमध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेसने वाशी येथे स्वतंत्र निदर्शने केली होती.

नागपूर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथेही आंदोलनाचे वणवे पेटले होते. आता या आंदोलनाला अधिक धार देण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र येत राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील तरुणांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण राज्याने एकमुखाने आणि एकत्रितपणे तीव्र विरोध दर्शवला पाहिजे, असा संदेश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आघाडीच्या घटक पक्षांना दिला आहे. त्यानुसार शुक्रवारी मुंबईत शिवतीर्थावर होणाऱ्या मुख्य आंदोलनासोबतच राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निदर्शने केली जाणार आहेत.

या आंदोलनासाठी महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवतीर्थावरील संभाव्य मोठी गर्दी पाहता शुक्रवारी दादर आणि आसपासच्या परिसरातील वाहतुकीचा मोठा खोळंबा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 241
आंदोलन निदर्शने महाविकास आघाडी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

By Annant Ppangarkar07/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: राजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत शाळा व्यवस्थापन…

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

आज सोमवार, ०७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

07/09/2026

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.