Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
राजकारण

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

एका बाजूला दिल्लीत शेतकऱ्यांची महासभा सुरू असतानाच दुसरीकडे विद्यार्थ्यांचे हे उग्र आंदोलन पेटल्यामुळे केंद्र सरकारसमोर मोठे दुहेरी संकट उभे राहिले आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

नवी दिल्ली: 

जंतर मंतर मैदानावर सीजेपी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर अत्यंत घणाघाती टीका केली आहे. 

राहुल गांधी यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत केवळ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीच नव्हे, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशी थेट मागणी लावून धरली आहे. तसेच घडलेल्या या संपूर्ण प्रकरणावर पंतप्रधान मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

घटनेनंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, संसदेत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित हा महत्त्वाचा प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली होती. मात्र, या विषयावर चर्चेसाठी सरकारशी बोलावे लागेल असे उत्तर अध्यक्षांनी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देश घडवणाऱ्या तरुणांवर आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे ही त्यांची गाऱ्हाणी ऐकून घेण्याची किंवा त्यांना हाताळण्याची योग्य पद्धत मुळीच नाही. सध्या देशातील संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ताबा मिळवला असून विद्यापीठांच्या कुलगुरूपदी प्रचारकांचीच नियुक्ती केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. शिक्षण क्षेत्रावर वाढता व्यापारी प्रभाव आणि तरुणांसमोरील रोजगाराचे संकट यावर भाष्य करत त्यांनी केंद्र सरकार विद्यार्थ्यांचा आवाज जाणीवपूर्वक दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले.

दरम्यान, आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमारात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात जाऊन जखमी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. एका बाजूला दिल्लीत शेतकऱ्यांची महासभा सुरू असतानाच दुसरीकडे विद्यार्थ्यांचे हे उग्र आंदोलन पेटल्यामुळे केंद्र सरकारसमोर मोठे दुहेरी संकट उभे राहिले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 344
Cjp आंदोलन राहुल गांधी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.