Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

या खटल्यात फिर्यादी श्रीराम फायनान्स कंपनीच्या वतीने ॲड. राजू बबनराव खरे यांनी काम पाहिले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/09/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन:
श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर (ता. अकोले) येथील कर्जदाराला संगमनेर येथील न्यायालयाने सहा महिने कारावास आणि चेकच्या दुप्पट रक्कमेसह ९ टक्के व्याजाचा दंड ठोठावला आहे. मुदतीत दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला अतिरिक्त सहा महिने कारावास भोगवावा लागणार आहे.
संगमनेर येथील तिसरे वरिष्ठ व अतिरिक्त न्यायदंडाधिकारी पी. बी. जोशी यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. समशेरपूर येथील आरोपी संजय भाऊराव सावंत यांनी श्रीराम फायनान्स लिमिटेड, शाखा संगमनेर कडून कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी त्यांनी दिलेला धनादेश बँकेत अनादरित (बाऊन्स) झाला. यानंतर कायदेशीर मुदतीत रक्कमेची परतफेड न केल्यामुळे फायनान्स कंपनीने आरोपीविरुद्ध न्यायालयात कलम १३८ अन्वये केस क्र. ४६४/२०१५ दाखल केली होती.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि गुणदोष विचारात घेऊन आरोपी संजय सावंत यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच चेकच्या दुप्पट रक्कम दंडाच्या स्वरूपात एक महिन्याच्या आत फायनान्स कंपनीस देण्याचे आणि ती रक्कम देईपर्यंत ९ टक्के दराने व्याज भरण्याचे आदेश दिले. ही रक्कम मुदतीत न दिल्यास आरोपीस आणखी सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल.
या खटल्यात फिर्यादी श्रीराम फायनान्स कंपनीच्या वतीने ॲड. राजू बबनराव खरे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. विजय देवगिरे, ॲड. स्नेहा गोडसे, ॲड. सुहास गोर्डे आणि ॲड. वैष्णवी राजू खरे यांनी कायदेशीर सहकार्य केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 213
कारावास चेक बाउन्स शिक्षा संगमनेर न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.