Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम
न्यायालय

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

अतिरिक्त सत्र न्यायाधीश विवेक बी. गव्हाणे यांनी अकोले प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली २ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा आणि दंडाची कारवाई कायम ठेवणारा निकाल दिला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन:

अकोले तालुक्यातील चांदगिरवाडी (एकदरा) येथे जमिनीच्या वादातून पती-पत्नीवर कोयता, लोखंडी रॉड आणि काठ्यांनी प्राणघातक हल्ला करणाऱ्या तीन आरोपींचे अपील संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विवेक बी. गव्हाणे यांनी अकोले प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली २ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा आणि दंडाची कारवाई कायम ठेवणारा निकाल दिला आहे. रामदास खंडू भांगरे, दामू खंडू भांगरे आणि विष्णू खंडू भांगरे (सर्व रा. चांदगिरवाडी, अकोले) अशी शिक्षा कायम झालेल्या आरोपींची नावे आहेत.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, ७ फेब्रुवारी २००४ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आरोपींनी जमिनीच्या जुन्या वादावरून फिर्यादी तुळशीराम भांगरे यांच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली होती. फिर्यादी बाहेर आले असता आरोपींनी त्यांना खाली पाडून मारहाण केली. या दरम्यान आरोपी विष्णू भांगरे याने तुळशीराम यांच्या हातावर कोयत्याने वार केल्याने त्यांच्या डाव्या हाताचे तर्जनीचे बोट (पहिला पेर) तुटून वेगळे झाले होते.

तर रामदास भांगरे आणि मयत आरोपी खंडू भांगरे यांनी काठ्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांची पत्नी सुमन मध्यस्थी करण्यासाठी आल्या असता आरोपी दामू भांगरे याने त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारून त्यांना जखमी केले होते. याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अकोले न्यायालयाने आरोपींना भादंवि कलम ३२६ (गंभीर दुखापत करणे) आणि ३२४ (घातक शस्त्राने दुखापत करणे) अंतर्गत दोषी ठरवून २ वर्षे आणि १ वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरुद्ध आरोपींनी संगमनेर सत्र न्यायालयात फौजदारी अपील दाखल केले होते. अपील प्रलंबित असताना आरोपी न्यायालयात गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरुद्ध जामीनपात्र आणि बिगरजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.

सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी तपासाधिकारी यांचा झालेला मृत्यू, पंच साक्षीदार फितूर होणे आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा अभाव या मुद्द्यांवर युक्तिवाद केला. मात्र, सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. एम. पी. गवते यांनी फिर्यादी, त्यांची जखमी पत्नी आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. बुद्ध लहामटे यांची साक्ष न्यायालयात मांडली. वैद्यकीय अहवालानुसार गंभीर दुखापत झाल्याचे सिद्ध झाले.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश विवेक बी. गव्हाणे यांनी पुराव्यांचे स्वतंत्र मूल्यमापन करताना नमूद केले की, घटनेत जखमी झालेल्या पती-पत्नीची साक्ष अत्यंत नैसर्गिक आणि विश्वासार्ह आहे. तपासाधिकाऱ्यांचा मृत्यू किंवा पंच साक्षीदार फितूर झाल्यामुळे न्यायालयाचा न्यायदानातील विश्वास कमी होत नाही. आरोपींनी केलेल्या गंभीर गुन्ह्याच्या तुलनेत कनिष्ठ न्यायालयाने दिलेली शिक्षा आधीच सौम्य स्वरूपाची आहे.

त्यामुळे न्यायालयाने आरोपींचे अपील पूर्णपणे फेटाळून लावले आणि अकोले न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. तसेच फरार आरोपींचे जामीनपत्र जप्त करून रक्कम वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. आरोपींविरुद्ध तत्काळ शिक्षेचे वॉरंट बजावण्याचे आदेशही न्यायालयाने जारी केले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 959
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय निकाल सक्तमजुरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.