Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
न्यायालय

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. जी. गव्हाणे यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि डॉक्टरांची साक्ष ग्राह्य धरत, सादर केलेला सबळ युक्तिवाद मान्य केला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन:

दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका व्यक्तीच्या डोक्यात व तोंडावर दगड मारून त्यांची निघृण हत्या करणाऱ्या आरोपीस संगमनेर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त ३ महिन्यांची शिक्षा भोगावी लागणार आहे. 

३१ ऑगस्ट २०२६ रोजी न्यायालयाकडून हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर २०२२ रोजी दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. आरोपी काशिनाथ रामनाथ गिऱ्हे हा दारूच्या नशेत फिर्यादी इंदुबाई बारकु गिऱ्हे यांच्या घराच्या दारात आला होता. “तुझ्या पतीने मला गावातून येताना आईवरून शिवीगाळ केली, तो कुठे आहे? मी आज त्याला जिवंत सोडणार नाही,” असे म्हणून आरोपी दारातच ओरडाओरड करत होता.

त्याच वेळी इंदुबाई यांचे पती बारकु गिऱ्हे हे मागून आपल्या घरी आले. आरोपी काशिनाथ याने बारकु यांना घराच्या दारातील ओट्याजवळ खाली पाडले आणि जवळच पडलेला एक मोठा दगड हातात घेऊन त्यांच्या डोक्यात व तोंडावर ४ ते ५ वेळा जोरात मारला.

गंभीर मार लागल्यामुळे बारकु गिऱ्हे हे जागीच निपचित पडले. फिर्यादी व इतरांच्या आरडाओरड्यानंतर परिसरातील लोक जमा झाले. गंभीर जखमी अवस्थेत बारकु यांना रुग्णवाहिकेतून अकोले येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी फिर्यादी इंदुबाई गिऱ्हे यांच्या तक्रारीवरून अकोले पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

सदर केसची सुनावणी जिल्हा न्यायालय क्र. ४, संगमनेर यांच्यापुढे पार पडली. खटल्यादरम्यान एकूण ७ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यामध्ये फिर्यादी, त्यांची मुलगी सविता केरु पारधी, डॉ. सुरेखा एस. करवंदे तसेच तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली.

जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. जी. गव्हाणे यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि डॉक्टरांची साक्ष ग्राह्य धरत, सादर केलेला सबळ युक्तिवाद मान्य केला. सर्व पुरावे व साक्षीदारांच्या जबाबांवरून आरोपी काशिनाथ रामनाथ गिऱ्हे याच्यावरील हत्येचा आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यास जन्मठेप आणि ५०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 261
जन्मठेप जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026

चेक बाऊन्स प्रकरणी संगमनेर येथील सराफाला ६ महिने कारावास आणि साडेसहा लाखांच्या भरपाईचा आदेश

19/08/2026

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

30/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

By Annant Ppangarkar01/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका व्यक्तीच्या डोक्यात व तोंडावर दगड मारून…

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.