Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी
सामाजिक

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

सण-उत्सवाच्या काळात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घेऊन वीजपुरवठा सुरळीत ठेवावा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन:

पवित्र श्रावण महिन्यात एकीकडे नागरिकांचे धार्मिक विधी, गृहप्रवेश, भंडारा आणि पूजा-अर्चा यांसारखे कार्यक्रम सुरू असताना, दुसरीकडे संगमनेर शहर व ग्रामीण भागात महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना तीव्र त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोणताही वादळ-वारा किंवा पाऊस नसताना महावितरणचा निष्क्रियपणा उघड झाला असून, अखंडीत वीजपुरवठा देण्यास वीज महामंडळ पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हा संघटक रवींद्र उर्फ पप्पू कानकाटे यांनी महावितरण प्रशासनाला दिला आहे.

सध्या ग्रामीण भागात तीन-तीन तास भारनियमन (लोडशेडिंग) सुरू असून संगमनेर शहरातही विजेचा लपंडाव कायम आहे. अचानक वीज गायब होत असल्याने ज्या व्यावसायिकांचा व्यवसाय पूर्णपणे विजेवर अवलंबून आहे, त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून नागरिकांचे हाल होत आहेत. त्यातच अनेक ठिकाणी विजेच्या तारा धोकादायकरीत्या खाली लोमकाळलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे शॉर्टसर्किट होऊन आगी लागण्याच्या दुर्घटना घडत असून यामुळे मोठ्या जीवितहानीची शक्यता निर्माण झाली आहे.

एखादा सामान्य नागरिक वीज बिल भरण्यास उशीर करतो तेव्हा वीज कनेक्शन त्वरित तोडण्यात जी तत्परता अधिकारी दाखवतात, तीच तत्परता खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी का दाखवली जात नाही, असा संतप्त सवाल या वेळी उपस्थित करण्यात आला.

येत्या काही दिवसांत गणेशोत्सव सुरू होत असून या काळात विविध गणेश मंडळे व नागरिक रोषणाई तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. या सण-उत्सवाच्या काळात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घेऊन वीजपुरवठा सुरळीत ठेवावा. अन्यथा वीज महामंडळाच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना उपजिल्हा संघटक रवींद्र उर्फ पप्पू कानकाटे, उपशहर प्रमुख कैलास गायके, नितीन पारखे, युवा सेनेचे वैभव अभंग, विभाग प्रमुख दीपक अभंग आणि किरण गुंजाळ यांनी संयुक्तपणे दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 550
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar18/10/20260

मेष – आजच्या दिवशी मनाची द्विधावस्था राहील. संपूर्ण खात्री करूनच संमती द्या. नसती काळजी करत…

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.