Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

पोलीस निरीक्षक समीर बारवकर हे त्यांच्या पथकासह तेथे पोहोचले. त्यांनी आमदार अमोल धोंडिबा खताळ (वय ४८) हे दर्शनासाठी येणार असल्याचे सांगत प्रसाद गुंजाळ यांना मंदिराच्या पटांगणातून बाहेर घेऊन आले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

(विशेष प्रतिनिधी):

संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांच्या देखत मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांचे समर्थक संदेश बाळासाहेब देशमुख यांनी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ (वय २८, रा. खांडगाव) या तरुणाच्या गालावर चापटा मारून दुखापत केली व जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संदेश देशमुख यांच्याविरुद्ध एनसीआर (N.C.R.) दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास खांडगाव येथील शेतकरी प्रसाद गुंजाळ हे नेहमीप्रमाणे खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेरील पटांगणात बसलेले असताना, पोलीस निरीक्षक समीर बारवकर हे त्यांच्या पथकासह तेथे पोहोचले. त्यांनी आमदार अमोल धोंडिबा खताळ (वय ४८) हे दर्शनासाठी येणार असल्याचे सांगत प्रसाद गुंजाळ यांना मंदिराच्या पटांगणातून बाहेर घेऊन आले.

त्यानंतर पोलिसांनी प्रसाद गुंजाळ यांना ताब्यात घेऊन पोलीस गाडीकडे नेण्यास सुरुवात केली. त्याच वेळी आमदार अमोल खताळ यांचे सहकारी संदेश बाळासाहेब देशमुख (रा. राजापूर, ता. संगमनेर) तिथे आले. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या प्रसाद यांच्याशी त्यांनी कोणत्याही कारणाशिवाय हुज्जत घातली. संदेश देशमुख यांनी प्रसाद यांच्या डाव्या डोळ्यावर आणि डाव्या गालावर दोन-तीन चापटा मारून दुखापत केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.

त्यावेळी उपस्थित पोलिसांनी संदेश देशमुख यांच्या तावडीतून प्रसाद गुंजाळ यांची सुटका केली. मारहाणीत दुखापत झाल्यामुळे पोलिसांनी गुंजाळ यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेले.

उपचारानंतर गुंजाळ यांच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संदेश बाळासाहेब देशमुख यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ११५(२) आणि ३५२ अन्वये एनसीआर नंबर ११५५/२०२६ नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार जी. सोनवणे करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,656
एन सी आर प्रसाद गुंजाळ मारहाण संदेश देशमुख
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.