Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार
सामाजिक

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

या सत्कार सोहळ्याचे औचित्य साधून मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. "पत्रकारिता हा व्यवसाय नाही, तर ती लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाजाचे ऋण फेडण्याची संधी आहे, हे पांगारकर सरांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले," असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/09/2026Updated:02/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

लेखणीला विचारांची दिशा देणारे, सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणण्याची हिंमत बाळगणारे, संगमनेर तालुक्याच्या पत्रकारितेचा मानदंड असलेले संवेदनशील ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेडकरी चळवळ आणि काँग्रेस परिवाराच्यावतीने आज हृदयपूर्वक सत्कार करण्यात आला.

पांगारकर सर म्हणजे केवळ एक पत्रकार नाहीत, तर ते एक विचार आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या काळात अनेक वेळा पुण्यनगरीसह राज्यातील नामांकित दैनिकांचे विभागीय प्रतिनिधी, उपसंपादक, ब्युरो चीफ म्हणून जबाबदारी सांभाळत, वंचित, शोषित, पीडितांच्या व्यथेला वाचा फोडली. त्यांच्या लेखणीत नेहमीच पुरोगामी महाराष्ट्राची, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांची झलक राहिली आहे. सत्तेला प्रश्न विचारण्याची आणि समाजाच्या शेवटच्या घटकासाठी लिहिण्याची त्यांची भूमिका आजच्या काळात दुर्मिळ आहे.

या सत्कार सोहळ्याचे औचित्य साधून मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “पत्रकारिता हा व्यवसाय नाही, तर ती लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाजाचे ऋण फेडण्याची संधी आहे, हे पांगारकर सरांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले,” असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.

यावेळी शुभेच्छा देण्यासाठी व सत्कारासाठी उपस्थित मान्यवर अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बंटी यादव, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते के. एस. (नाना) गायकवाड, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष अरुणकाका गावित्रे, ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत के. पी. बनसोडे सर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शशिकांत थोरात, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस रामनाथ गायकवाड, संगमनेर शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोनू गायकवाड, आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व पॅन्थर विनोद गायकवाड, जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया समन्वयक उदय अभंग, महेश हांडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी अनंत पांगारकर सरांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि त्यांच्या लेखणीला अधिकाधिक बळ मिळो, अशा मनापासून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आंबेडकरी समाजाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 93
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar18/10/20260

मेष – आजच्या दिवशी मनाची द्विधावस्था राहील. संपूर्ण खात्री करूनच संमती द्या. नसती काळजी करत…

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.