संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”
शहराच्या विकासाशी थेट संबंधित असणारे नगरविकासासारखे अत्यंत महत्त्वाचे खाते आणि त्यासोबत परिवहन खाते हातात असताना, स्मारकासाठी आवश्यक वाढीव जागेचा विषय शासनस्तरावर सोडवण्यासाठी पुरेसा कालावधी आणि संधी उपलब्ध होती. तरीही हा प्रश्न प्रलंबित राहिला





