Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात
राजकारण

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

पठार भागातील डोळासणे परिसरातील अनेक कुटुंबांना गेल्या चाळीस वर्षांपासून हक्काच्या निवासी वीज जोडणीपासून वंचित राहावे लागत होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर :

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील डोळासणे परिसरातील नागरिकांच्या निवासी वीज जोडणीचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार अमोल खताळ पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत ओटीएसपी (OTSP) योजनेतून निवासी वीज जोडणीसाठी १० लाख १ हजार ७९७ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे निधी मंजूर होताच प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाल्याने गेल्या चार दशकांपासून वीजेची वाट पाहणाऱ्या डोळासणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पठार भागातील डोळासणे परिसरातील अनेक कुटुंबांना गेल्या चाळीस वर्षांपासून हक्काच्या निवासी वीज जोडणीपासून वंचित राहावे लागत होते. स्थानिक नागरिकांची ही मूलभूत गरज ओळखून आमदार अमोल खताळ पाटील यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष सहकार्याने आणि शासनस्तरावरील प्रभावी पाठपुराव्यामुळे हा निधी तातडीने मंजूर करून घेण्यात त्यांना यश मिळाले आहे.

या कामामुळे परिसरातील अनेक कुटुंबांच्या घरात आता कायमस्वरूपी प्रकाश पोहोचणार आहे. जे काम मागील चाळीस वर्षांत केवळ आश्वासनांपर्यंत मर्यादित राहिले, ते काम आमदार अमोल खताळ यांनी आमदारकीच्या अवघ्या एका वर्षात प्रत्यक्ष पूर्ण करून दाखवल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

मागील चाळीस वर्षांत केवळ आश्वासने आणि चर्चाच झाल्या, परंतु नागरिकांच्या या मूलभूत प्रश्नावर प्रत्यक्ष काम झाले नाही. आमदार खताळ यांनी पदभार स्वीकारल्यापासून या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला. अवघ्या एका वर्षात त्यांनी या कामासाठी १० लाखांहून अधिक निधी मंजूर करून आणला आणि कामही सुरू केले. दैनंदिन जीवनाशी निगडित वीज जोडणीचा प्रश्न सुटल्यामुळे डोळासणे परिसरातील नागरिकांच्या वतीने मी आमदार खताळ यांचे आभार मानत असल्याचे राहुल मुके यांनी म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 328
अमोल खताळ डोळसणे निधी विज जोडणी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी…

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.