Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पत्रकारावर हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार टोळीचे तोफखाना पोलिसांनी मोडले कंबरडे; केली ही मोठी कारवाई
गुन्हेगारी

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार टोळीचे तोफखाना पोलिसांनी मोडले कंबरडे; केली ही मोठी कारवाई

या टोळीवर तोफखाना आणि पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, फसवणूक आणि जबरी मारहाण यांसारखे १३ गंभीर गुन्हे आधीपासूनच दाखल आहेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

अहिल्यानगर:

शहरातील पाईपलाईन रोड भागात पत्रकाराला बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार टोळीविरुद्ध तोफखाना पोलिसांनी आता कडक कायदेशीर कारवाई केली आहे. टोळीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि सततची दहशत लक्षात घेता पोलिसांनी या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे संघटित गुन्हेगारीविरोधी ‘कलम १११’ हे वाढीव कलम जोडले आहे. या कारवाईमुळे अहिल्यानगरमधील या सराईत गुन्हेगारांचे कंबरडे मोडले असून नागरिकांमधील भीतीचे वातावरण दूर होण्यास मदत होणार आहे.

गुरुवारी (२० ऑगस्ट) फिर्यादीचे सुपुत्र सार्थक थोरात हे आपल्या मारुती आल्टो कारने भिस्तबाग चौक ते एकविरा चौकाकडे जात होते. त्यावेळी मोपेड मोटरसायकलवरील चालकाने कारला पाठीमागून धडक दिली आणि सार्थक यांच्याशी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सार्थक यांनी या घटनेबाबत आपले वडील पत्रकार सुशिल थोरात यांना कळवले. सुशिल थोरात हे तात्काळ एचडीएफसी बँकेजवळ घटनास्थळी पोहोचले.

तेथे उपस्थित असलेल्या सराईत गुन्हेगारांनी पत्रकार सुशिल थोरात यांना देखील शिवीगाळ करत दगडाने त्यांच्या डोक्यात प्रहार केला. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी त्यांचे हात-पाय धरून गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांच्या मुलाला देखील लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली.

तीन सराईत आरोपींना अटक

या गंभीर गुन्ह्याचा तपास करत पोलिसांनी सोनू उर्फ हेमंत दत्तात्रय कोहक (वय २७, रा. बोलहेगाव), महेश उर्फ पप्पू दशरथ मते (वय २७, रा. पाईपलाईन रोड) आणि प्रशांत शिवाजी निक्रद (वय २८, रा. तागड वस्ती) या तीन आरोपींना २४ ऑगस्ट २०२६ रोजी बेड्या ठोकल्या. न्यायालयाने या आरोपींना २८ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

या टोळीवर तोफखाना आणि पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, फसवणूक आणि जबरी मारहाण यांसारखे १३ गंभीर गुन्हे आधीपासूनच दाखल आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही या गुन्हेगारांच्या वर्तनात कोणताही सुधार झाला नव्हता. ते शहरात नियमितपणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत दहशत पसरवत होते. या टोळीचा समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि त्यांची गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी तोफखाना पोलिसांनी अपर पोलीस अधीक्षक वैभव कल्लुर्मे यांच्याकडे भारतीय न्याय संहिता २०२३ चे ‘कलम १११’ (संघटित गुन्हेगारी) हे वाढीव कलम लावण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर गुन्ह्यात हे कडक कलम समाविष्ट करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 367
कारवाई तोफखाना पोलीस ठाणे बीएनएस कलम 111
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.