Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त
गुन्हेगारी

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

पोलीस अधीक्षकांच्या थेट मार्गदर्शनाखाली झालेल्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

नेवासा / श्रीगोंदा:

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर व बंदी असलेल्या गुटखा-तंबाखूच्या विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या थेट आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ ऑगस्ट रोजी सोनई आणि बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच वेळी ५ विविध ठिकाणी छापे टाकून ही मोठी कारवाई केली. या धडक कारवाईत एकूण ८९,३६६ रुपये किमतीचा बंदी असलेला पानमसाला, मावा आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला असून ८ आरोपींवर ५ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली निळकंठ कारखेले, अतुल लोटके, विकास साळवे, सतीष भवर, गणेश लोंढे, रोहित येमुल, बाळासाहेब गुंजाळ, रणजीत जाधव, शामसुंदर जाधव, प्रताप देवकाते, मनोज साखरे, अमोल आजबे, प्रकाश मांडगे व अमोल कोतकर या पोलीस अंमलदारांची दोन विशेष पथके तयार करून कारवाईसाठी रवाना करण्यात आली होती.

या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सोनई व बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापे टाकले. यात सोनई पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सोनईतील शब्बीर महेताब सय्यद (वय ४५) याच्याकडून १३,२६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसऱ्या कारवाईत सोनईतीलच हलवाई गल्ली येथील रहिवासी जावेद उस्मान शेख (वय ५२) याच्याकडून २०,२४८ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

तसेच बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या कारवाईत चिंभळा येथील सोमनाथ उर्फ गणेश प्रकाश घोरपडे (वय ३५) याच्याकडून ५,०३८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, तर त्याचा साथीदार काष्टी येथील संकेत अशोक पाचपुते हा फरार झाला. बेलवंडीतील दुसऱ्या छाप्यात चिंभळा येथील विजय सतीष चोरडिया (वय ३३) याच्याकडून १६,४०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून त्याला माल पुरवणारा दौंड येथील कमलेश मुरली कृपालीनी फरार झाला आहे. बेलवंडी हद्दीतील तिसऱ्या कारवाईत बेलवंडीतील जाकीर इसाक शेख (वय ३९) याला ३४,४२० रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून अहिल्यानगरचा फयाज तांबोळी हा फरार घोषित करण्यात आला आहे.

सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि ३(५) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस अधीक्षकांच्या थेट मार्गदर्शनाखाली झालेल्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 433
अहिल्यानगर एलसीबी गुटखा छापे पोलीस कारवाई मावा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शासकीय कामांसाठी आणि सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर भूमाफियांनी आणि अतिक्रमणधारकांनी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.