Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

27/08/2026

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026

५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच वेळी “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन करून नवा विश्वविक्रम

27/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल
गुन्हेगारी

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने शहरात मोठी कारवाई केली आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
अहिल्यानगर:
अहिल्यानगर शहरातील अवैध मावा आणि सुगंधीत तंबाखू बनविणाऱ्या दोन वेगवेगळ्या कारखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ ऑगस्ट रोजी धाडी टाकल्या. या धडक कारवाईत पोलिसांनी इलेक्ट्रिक मशीन, सुगंधीत तंबाखू आणि माव्यासह एकूण ४ लाख ३९ हजार ४८६ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून ५ आरोपींविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात २ स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने शहरात मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची दोन विशेष पथके तयार करून शहरात अवैध गुटखा व मावा विक्री करणाऱ्यांची माहिती काढण्यासाठी रवाना केले होते.
तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या पथकांनी शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. या कारवाईत पोलिसांनी मावा बनवण्याच्या इलेक्ट्रिक मशीन्स, वजन काटा, सुपारी बारीक करण्याची मशीन, ४७ किलो तयार मावा, २६ किलो सुगंधीत तंबाखू, १४५ किलो सुपारी व सुपारीचा चुरा असा मोठा साठा हस्तगत केला.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पहिल्या कारवाईत (गु.र.नं. ७३८/२०२६) ६६ हजार ९८६ रुपयांच्या मुद्देमालासह आदेश किसन भिंगारदिवे (वय २३, रा. भिंगारदिवे मळा, बोल्हेगाव) याला ताब्यात घेण्यात आले. तर दुसऱ्या कारवाईत (गु.र.नं. ७३९/२०२६) ३ लाख ७२ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह कृष्णा यादव वैराळ (वय ३४, रा. सर्जेपुरा), मोसीम रफिक शेख (वय ३८, रा. मुकूंदनगर) व वसीम रफिक शेख (वय ३२, रा. मुकूंदनगर) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी राकेश सब्बन (रा. दातरंगे मळा) हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस अंमलदार अरूण गांगुर्डे, विकास साळवे, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, संदीप पवार, विजय ठोंबरे, अतुल लोटके, शाहीद शेख, अभिजीत आरकल, सतीष भवर तसेच महिला पोलीस अंमलदार चिमा काळे व सुनिता पवार यांच्या पथकाने केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 117
अहिल्यानगर एलसीबी गुन्हेगारी छापा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांना लुटणारी टोळी जेरबंद; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन गुन्ह्यांचा उलगडा

26/08/2026

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार टोळीचे तोफखाना पोलिसांनी मोडले कंबरडे; केली ही मोठी कारवाई

26/08/2026

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

By Annant Ppangarkar27/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर शहरातील अवैध मावा आणि सुगंधीत तंबाखू बनविणाऱ्या…

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026

५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच वेळी “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन करून नवा विश्वविक्रम

27/08/2026

संगमनेरचा ईद ए मिलाद जुलूस शांततेत पार; आयोजक, नागरिक आणि पोलीस प्रशासनाचे कौतुक!

27/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.