Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष
राजकारण

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा होताच संगमनेरमधील 'झेन झी' म्हणजेच तरुण पिढीने रस्त्यावर उतरून मोठा जल्लोष केला. फटाक्यांच्या दणदणाटात आणि 'झेन जी जिंदाबाद'च्या गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
केंद्रातील हुकूमशाही आणि गर्विष्ठ सरकारला देशातील तरुणाईने पुरते नमवले आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्यानंतर पेटून उठलेल्या या संघर्षापुढे झुकत केंद्र सरकारला शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावाच लागला. या ऐतिहासिक यशाचे संगमनेरमध्ये काँग्रेससह सर्व समविचारी व पुरोगामी पक्षांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. देशातील लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी व केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी आता संपूर्ण तरुणाई सज्ज झाली आहे, असा घणाघाती इशारा संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिला.
दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या २८ दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर अभूतपूर्व यश मिळाले. संगमनेर बस स्थानक परिसरात शहर व तालुका युवक काँग्रेस, छात्र भारती, ठाकरे शिवसेना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सत्यशोधक समाज, दलित पॅंथर, शेतकरी संघटना, एनएसयूआय, महिला संघटना आणि विविध पुरोगामी विद्यार्थी संघटनांच्या वतीने एकत्र येत या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शवण्यात आला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी धडकताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत आणि गुलाल उधळत मोठा आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला चढवताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, शिक्षण व्यवस्थेत माजलेला भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन तरुण जंतर-मंतरवर २४ तास ठिय्या मांडून होते. मात्र, निगरगट्ट केंद्र सरकारने त्यांच्या रास्त मागण्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर २० जुलै रोजी अमानुषपणे लाठीहल्ला घडवून आणत हे आंदोलन दडपण्याचा प्रकार केला.
या हल्ल्यात अनेक तरुण-तरुणी गंभीर जखमी झाले. केंद्र सरकारला अत्यंत उशिरा जाग आली असली तरी तरुणांच्या अभेद्य एकजुटीने या गर्विष्ठ सरकारला गुडघे टेकण्यास भाग पाडले आहे. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा ही केवळ पहिली पायरी असून अजूनही अनेक मुख्य प्रश्न कायम आहेत, त्याविरोधात हा लढा असाच चालू राहील.
माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनीही केंद्र सरकारच्या क्रूर धोरणांवर जोरदार ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या की, रस्त्यावर उतरलेले हे विद्यार्थी कोणत्या एका पक्षाचे कार्यकर्ते नव्हते, तर ते या देशाचे उज्ज्वल भवितव्य होते. भर पावसात रस्त्यावर झोपलेल्या या मुला हालहाल झाले, मुलींचा छळ झाला. इंग्रज अधिकारीसुद्धा ज्या पद्धतीने वागले नसतील, त्याहून अधिक क्रूरपणे हे केंद्र सरकार वागले आहे. पण देशातील जागृत तरुणाईने या हुकूमशाही सरकारला त्यांची खरी जागा दाखवून दिली आहे.
या जनआंदोलनाच्या विजयाप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमर कतारी, रंजना गवांदे, तुषार पानसरे आणि शेखर सोसे यांनीही केंद्र सरकारच्या तरुणविरोधी धोरणांचा चांगलाच समाचार घेतला.

‘झेन झी’ चा संगमनेरमध्ये एल्गार! – शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा होताच संगमनेरमधील ‘झेन झी’ म्हणजेच तरुण पिढीने रस्त्यावर उतरून मोठा जल्लोष केला. फटाक्यांच्या दणदणाटात आणि ‘झेन जी जिंदाबाद’च्या गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आगामी काळात देशाची लोकशाही आणि राज्यघटना धोक्यात आणणाऱ्या प्रत्येक ताकदीविरोधात एकत्र येऊन असाच लढा तीव्र करू, असा निर्धार यावेळी उपस्थित युवकांनी व्यक्त केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 713
जंतर मंतर आंदोलन जयश्री थोरात धर्मेंद्र प्रधान राजीनामा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

By Annant Ppangarkar08/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील महिलांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने संगमनेर नगर…

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.