Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता
राजकारण

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

'पोलीस प्रशासन हे सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी आहे की सत्ताधारी पुढार्‍यांची मर्जी राखण्यासाठी?' असा थेट प्रश्न आता संगमनेरकर विचारू लागले आहेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –
शहरातील महिलांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने संगमनेर नगर परिषदेने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलत अद्ययावत अशा दोनशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा कार्यान्वित केली. मात्र, एका राजकीय दबावाला बळी पडत स्थानिक पोलीस प्रशासनाने या अतिशय संवेदनशील कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत नगरपालिका कटिबद्धता दाखवत असताना पोलीस प्रशासनाने दाखवलेल्या या बेजबाबदार उदासीनतेमुळे संगमनेर शहर आणि तालुक्यात संताप निर्माण झाला आहे.
संगमनेर हे आधुनिक आणि विकसित शहर म्हणून ओळखले जाते. शहरातील महिलांना निर्भय वातावरण मिळावे आणि आपत्कालीन स्थितीत तातडीने मदत पोहचावी याकरता नगर परिषदेने राज्यातील पहिली मानली जाणारी आपत्ती निवारण यंत्रणा उभारली आहे. या डिजिटल कंट्रोल रूमसह शहरातील ११ प्रमुख चौकांमध्ये थेट सूचना देण्यासाठी स्पीकर व्यवस्थाही बसवण्यात आली आहे. या अद्ययावत यंत्रणेचा लोकार्पण सोहळा राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
नगरपालिकेच्या वतीने या कार्यक्रमाचे रीतसर निमंत्रण उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शहर पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षकांसोबत बैठक असल्याचे कारण देत पोलीस अधिकाऱ्यांनी या सोहळ्याला अनुपस्थित राहणे पसंत केले. विशेष म्हणजे, या बैठकीची सत्यता पडताळून पाहिली असता अशी कोणतीही बैठक आयोजित केलीच गेली नव्हती, अशी माहिती उघडकीस आली आहे. यामुळे पोलीस प्रशासनाने वरिष्ठांच्या बैठकीचे खोटे कारण पुढे करून केवळ सत्ताधाऱ्यांच्या राजकीय दबावापोटी या लोकहितोपयोगी कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
महिलांची सुरक्षा आणि गुन्हेगारीवर वचक बसवणे हा थेट पोलीस विभागाच्या अख्यात्यरीतील विषय असताना, नगरपालिकेने स्वतः पुढाकार घेऊन पोलिसांना मदतीचा हात दिला आहे. असे असतानाही केवळ राजकीय आका खूश करण्यासाठी पोलिसांनी या सोहळ्याला दांडी मारल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून संतप्त सवाल विचारले जात आहेत. ‘पोलीस प्रशासन हे सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी आहे की सत्ताधारी पुढार्‍यांची मर्जी राखण्यासाठी?’ असा थेट प्रश्न आता संगमनेरकर विचारू लागले आहेत.
सुरक्षेच्या विषयात राजकारण नको: बाळासाहेब थोरात
शहराच्या सुरक्षेशी संबंधित असलेल्या एवढ्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षकांनी उपस्थित राहणे ही केवळ औपचारिकता नसून त्यांची थेट जबाबदारी होती. निमंत्रण मिळूनही कार्यक्रमाला जायचे की नाही, असा विचार पोलीस प्रशासन कधीपासून करायला लागले? निवडणुका पार पडल्यानंतर आम्ही कधीही अशा पद्धतीचे खालच्या पातळीचे राजकारण केले नाही. शेवटी हा शहरातील नागरिक आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे अशा संवेदनशील विषयात राजकारण आणण्याऐवजी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे मत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 19
पोलीस राजकारण लोकार्पण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

By Annant Ppangarkar08/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील महिलांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने संगमनेर नगर…

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.