Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी
आंदोलन

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

सणासुदीचे दिवस जवळ आले असताना लोड शेडिंगमुळे नागरिकांच्या आनंदावर विरजण पडत असल्याचे दुर्गाताई तांबे म्हणाल्या
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –

राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आधीच हवालदिल झाले असताना, महावितरण विभागाने सुरू केलेल्या मनमानी लोड शेडिंगमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या गलथान कारभाराविरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत महावितरण कार्यालयावर शुक्रवारी धडक दिली. सायंकाळी ६ ते ९ या वेळेत कोणतीही लोड शेडिंग न करता पूर्ण दाबाने वीज पुरवठा सुरू ठेवावा, या मुख्य मागणीचे निवेदन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सुपूर्द केले.

यावेळी बोलताना युवक काँग्रेस अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी लोड शेडिंगमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि सुरक्षिततेवर होणाऱ्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधले. सायंकाळी शाळा सुटून घरी परतताना अंधार असल्याने हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका वाढतो, तसेच याच वेळेत शेतकरी बांधवांना दुग्ध व्यवसाय व गोठ्याची कामे करावी लागतात. त्यामुळे सायंकाळी ६ ते ९ या वेळेत वीजपुरवठा खंडित करू नये, असा इशारा त्यांनी दिला.

सणासुदीचे दिवस जवळ आले असताना लोड शेडिंगमुळे नागरिकांच्या आनंदावर विरजण पडत असल्याचे दुर्गाताई तांबे म्हणाल्या. सरकारने वेळेत, पूर्ण वेळ आणि योग्य दाबाने वीज पुरवणे ही त्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर पांडुरंग पाटील घुले यांनी महायुती सरकारवर टीका करत, मोफत विजेची घोषणा फक्त कागदावरच राहिल्याचा आरोप केला. तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांनी महागाई, बेरोजगारी आणि लोड शेडिंगच्या मुद्द्यावरून तीव्र संताप व्यक्त करत, वीज पुरवठा तत्काळ सुरळीत न झाल्यास रस्ता रोको करून उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

या आंदोलनात दुर्गाताई तांबे, पांडुरंग पाटील घुले, डॉ. जयश्रीताई थोरात, अजय फटांगरे, शरद नाना थोरात, बुवाजी बाबा पुणेकर, कैलास पानसरे, रमेश गुंजाळ, शिवाजी जगताप, विठ्ठल गुंजाळ, नरेंद्र गुंजाळ, सिताराम राऊत, योगेश पोकळे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाबाहेर सरकार व प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 94
जयश्री थोरात दुर्गाताई तांबे निवेदन महावितरण वीज भारनियमन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर वचक बसवण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका…

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.