Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी
दुर्दैवी

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष डॉ.जयश्री थोरात, कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी केले दुःख व्यक्त
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annat Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर:

संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या भीतीने पळताना शनिवारी शेततळ्यात पडून ११ वर्षीय कृष्णा वसंत पवार या बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. यापूर्वीही याच परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका लहान मुलाला आपला जीव गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र घबराट व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी शिवछत्रपती ERT टीमचे जवान नवनाथ सिनारे आणि प्रशांत पांडे यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. सुमारे अर्धा तास अथक प्रयत्न केल्यानंतर दोन्ही जवानांना मृतदेह शोधण्यात यश आले आणि तो पाण्यातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी संगमनेरच्या घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

जवळे कडलग आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. संध्याकाळच्या सुमारास बिबट्याच्या भीतीने पळ काढताना कृष्णाचा तोल जाऊन तो शेततळ्यात पडला आणि त्यातच त्याचा करुण अंत झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

या घटनेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. जयश्री थोरात यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जवळे कडलग येथील ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल चिंता व्यक्त केली. वनविभागाने व प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन परिसरात तातडीने पिंजरे लावावेत आणि बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी कृष्णाच्या शोकाकुल कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त करत शासनाने मृत बालकाच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत व नियमानुसार नुकसानभरपाई देण्याची मागणीही केली आहे. वारंवार सूचना देऊनही वनविभाग ठोस उपाययोजना करत नसल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने आतातरी गांभीर्याने पावले उचलून ग्रामीण भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सुरक्षा प्रदान करावी, असा सूर सर्व स्तरातून उमटत आहे.

संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे आज एक हृदयद्रावक घटना घडली. बिबट्या मागे लागल्याने जीव वाचवण्यासाठी धावत असलेल्या ११ वर्षीय कृष्णा वसंत पवार या मुलाचा शेततळ्यात पाय घसरून पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे जवळे कडलग परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने परिसरात तातडीने पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. – अमोल शेलकर, कार्याध्यक्ष संगमनेर तालुका काँग्रेस.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,182
अमोल शेलकर जयश्री थोरात जवळे कडलग दुर्दैवी घटना बाळासाहेब थोरात बिबट्या शेततळे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.