Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार
गुन्हेगारी

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

घटनेनंतर फरार झालेल्या तिन्ही ट्रॅक्टर मालकांचा पोलीस शोध घेत असून, पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

कोपरगाव-

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी आपला बडगा उगारला असून कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारात चालणाऱ्या बेकायदेशीर वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ११ लाख २ हजार रुपयांच्या दोन ट्रॅक्टरसह वाळू उपशाचे साहित्य जप्त केले असून घटनास्थळावरून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर ट्रॅक्टर मालकांसह अन्य तिघे जण पोलिसांची चाहुल लागताच फरार झाले आहेत.

अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतूक व तस्करांविरोधात कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गणेश लोंढे, निळकंठ कारखेले, संतोष खैरे, रणजीत जाधव, अमोल आजबे, रमीजराजा आत्तार आणि सतीश भवर यांच्या विशेष पथकाची स्थापना करून त्यांना कारवाईसाठी रवाना करण्यात आले होते.

रविवारी (३० ऑगस्ट) हे पथक कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतुकीची माहिती काढत गस्तीवर होते. याचदरम्यान, धारणगाव गावच्या शिवारातील गोदावरी नदीपात्रातून दोन इसम दोन ट्रॅक्टर आणि केणीच्या साहाय्याने बेकायदेशीरपणे वाळू उपसा करत असल्याची गोपनीय माहिती बातमीदाराकडून पथकाला मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी पंचासमक्ष घटनास्थळी छापा टाकून खात्री केली असता गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी घटनास्थळाला वेढा घालून छापा टाकला आणि ट्रॅक्टर चालक गणेश चंद्रभान नाईकवाडे (वय ३६, रा. धारणगाव, ता. कोपरगाव) व बाळू उर्फ नवनाथ गोपीनाथ सोनवणे (वय ३५, रा. धारणगाव, ता. कोपरगाव) या दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे ट्रॅक्टरच्या मालकांबाबत सखोल चौकशी केली असता, हे ट्रॅक्टर बबलू उर्फ सागर सुरेश चौधरी (रा. धारणगाव), नाना चंद्रभान नाईकवाडे (रा. धारणगाव) आणि शुभम कदम (रा. कुंभारी, ता. कोपरगाव) यांच्या मालकीचे असल्याचे समोर आले. या तिन्ही मालकांच्या सांगण्यावरूनच नदीपात्रातून वाळू उपसा करून तिचा साठा केला जात असल्याची कबुली चालकांनी दिली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी ५ लाख २ हजार रुपये किमतीचा विनाक्रमांकाचा पॉवरट्रॅक कंपनीचा ट्रॅक्टर व केणी, तसेच ६ लाख रुपये किमतीचा महिंद्रा कंपनीचा विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर असा एकूण ११ लाख २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा रजि. नं. ३७३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) सह पर्यावरण संरक्षण कायदा कलम ३/१५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर फरार झालेल्या तिन्ही ट्रॅक्टर मालकांचा पोलीस शोध घेत असून, पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 480
अवैध वाळू वाहतूक अहिल्यानगर एलसीबी गुन्हेगारी वाळू तस्करी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- रस्त्यावरील वाहनांच्या वादातून पिकअप चालकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या…

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.