Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
आंदोलन

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना घारगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि नंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

कौठे मलकापूर (संगमनेर): 

संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथे औद्योगिक वसाहतीसाठी (एमआयडीसी) प्रस्तावित असलेल्या जागेवर सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाला विरोध दर्शवत भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन करण्यात आले. सौर प्रकल्पाचे काम तातडीने बंद करून सर्व साहित्य जागेवरून हटवण्याची मागणी आंदोलकांनी केली. आंदोलन चिघळल्याने पोलिसांनी भाजप तालुकाध्यक्षासह १० ते १२ पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.

साकूर पठार भागातील हजारो बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कौठेमलकापूर येथे शेकडो हेक्टर जागेवर एमआयडीसी उभारण्याचा प्रकल्प मंजूर झाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यातून हा प्रकल्प मंजूर झालेला असताना, त्याच जागेवर सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू झाल्याने महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.

या आंदोलनात बाबासाहेब कुटे, सरपंच रविंद्र दातीर, रणजित ढेरंगे, सोमनाथ बारवे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि शेकडो नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी सौर प्रकल्पाचा एकही जबाबदार कर्मचारी उपस्थित नसल्याने आंदोलक अधिक आक्रमक झाले. एमआयडीसी रोखण्यासाठीच इथे सौर प्रकल्प आणला गेला आहे का, असा सवाल करत आंदोलकांनी यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा थेट आरोप केला. भाजप तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांनी दोन दिवसांत साहित्य न हटवल्यास जाळपोळ आणि तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रविण महाले यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांनी नायब तहसीलदार गणेश आढारी यांना निवेदन सादर केले. सध्या सौर प्रकल्पाचे काम स्थगित करण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार आढारी यांनी दिली; मात्र केवळ काम स्थगितीवर समाधान न मानता साहित्य पूर्णपणे हटवण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम राहिले.

निवेदन दिल्यानंतर आंदोलकांनी थेट सौर प्रकल्पाच्या मशिनरी व साहित्याच्या दिशेने मोर्चा वळवला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत गुलाबराजे भोसले, रणजित ढेरंगे, सरपंच रविंद्र दातीर आणि सोमनाथ बारवे यांच्यासह सुमारे १० ते १२ जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना घारगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि नंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 724
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.