Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल
राजकारण

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

सामान्य जनतेला अंधारात ठेवून प्रशासन चालणार नाही. नागरिकांना वीज का बंद केली जाते, कोणाच्या आदेशाने बंद केली जाते आणि त्याला कायदेशीर आधार काय आहे, याचे उत्तर महावितरणने द्यावे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन:
जर भारनियमन करण्याचे शासनाचे किंवा महावितरणचे अधिकृत परिपत्रक अथवा कायदेशीर आदेश असतील, तर ते त्वरित जनतेसमोर जाहीर करण्यात यावेत. आणि जर अधिकृत आदेश नसतील तर संगमनेर शहर आणि तालुक्यातील विजेचे भारनियमन कोणाच्या दबावाखाली केले जात आहे? असा थेट हल्लाबोल संगमनेर तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी केला आहे.
संगमनेर शहर आणि ग्रामीण भागात सध्या दररोज सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत सुरू असलेल्या अघोषित भारनियमनाविरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून, महावितरणच्या अनधिकृत कारभारावर आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या अघोषित वीज खंडिततेच्या प्रश्नावर संगमनेरकर, काँग्रेस कार्यकर्त्यांनी महावितरणच्या संगमनेर कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. या आंदोलनानंतरही भारनियमनाबाबतचे अनेक महत्त्वाचे आणि कायदेशीर प्रश्न अनुत्तरीतच राहिल्याने शेलकर यांनी महावितरण प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
महावितरण कार्यालयात भारनियमन कशाच्या आधारावर केले जाते याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना या वेळी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केवळ ‘मेसेजिंग सिस्टम’द्वारे प्राप्त होणाऱ्या सूचनांनुसार हे भारनियमन केले जात असल्याचे स्पष्टीकरण दिले. या दाव्यावर अमोल शेलकर यांनी प्रशासनाला थेट सवाल केला आहे.
जर भारनियमन करण्याचे शासनाचे किंवा महावितरणचे अधिकृत परिपत्रक अथवा कायदेशीर आदेश असतील, तर ते त्वरित जनतेसमोर जाहीर करण्यात यावेत. उपविभाग स्तरावर कोणतेही शासकीय परिपत्रक उपलब्ध नसताना आणि केवळ मेसेजच्या आधारे वीजपुरवठा खंडित केला जात असेल, तर या मनमानी कारभाराची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मैदानी स्तरावर काम करणारे सबस्टेशन कर्मचारी आणि सेक्शन इंजिनिअर हे वरिष्ठांच्या दबावाखाली काम करत असल्याचे चित्र आहे. वरिष्ठांचा त्रास नको म्हणून जर कर्मचारी अनधिकृत आदेश पाळत असतील, तर या संपूर्ण व्यवस्थेचा जबाबदार कोण, याचे स्पष्टीकरण महावितरणने द्यावे.
सायंकाळच्या वेळी अचानक वीज घालवल्यामुळे शेतकरी, लहान व्यावसायिक, नागरिक आणि अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. संगमनेरकर या समस्येने त्रस्त असताना सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत, अशी टीकाही शेलकर यांनी केली. महावितरणने पुढील आठ दिवसांत वीजपुरवठा पूर्ववत करावा आणि भारनियमनाचा अधिकृत आदेश जाहीर करावा, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने जनतेच्या हक्कांसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

सामान्य जनतेला अंधारात ठेवून प्रशासन चालणार नाही. नागरिकांना वीज का बंद केली जाते, कोणाच्या आदेशाने बंद केली जाते आणि त्याला कायदेशीर आधार काय आहे, याचे उत्तर महावितरणने द्यावे. – अमोल शेलकर

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 312
अमोल शेलकर भारनियमन महावितरण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar06/09/20260

आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी प्राप्त…

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.