Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात
राजकारण

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संकटकाळात सर्वसामान्य माणसाला दाद मागण्यासाठी जागाच उरलेली नाही
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/06/2026Updated:12/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर:
देशात सध्या सुरू असलेली लढाई ही केवळ सत्तेची नसून विचारधारेची आहे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि काँग्रेसची विचारधारा पूर्णपणे एकच असून राज्यघटना, संतांचे विचार, बहुजन समाज आणि पुरोगामी विचारसरणी हा आपल्या सर्वांचा सामायिक पाया आहे, आम्ही फक्त दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहोत इतकाच काय तो फरक आहे, शरद पवार हे प्रतिगामी विचारधारा कधीही स्वीकारू शकत नाहीत, असा विश्वास राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
संगमनेर तालुका दूध संघाच्या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसमधील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना थोरात यांनी ही महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. थोरात यांच्या या राजकीय विधानामुळे राजकारणात नवे संकेत जुळण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
काँग्रेसमधून बाहेर पडून तयार झालेली तृणमूल काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगवेगळ्या ठिकाणी विभागले गेल्यामुळे शक्ती कमी झाली आहे का, यावर बोलताना थोरात यांनी देशातील सद्यस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली. आज देशात लोकशाही आणि संविधान धोक्यात आले असून सर्व स्वायत्त संस्थांची स्वायत्तता संपत चालली आहे. माध्यमांचा जागतिक निर्देशांक खालावला आहे, माध्यमातून १५६ व्या नंबरवर आले आहे. तर न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जात आहे. निवडणूक आयोग खरोखर अस्तित्वात आहे का, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा संकटकाळात सर्वसामान्य माणसाला दाद मागण्यासाठी जागाच उरलेली नाही. त्यामुळे लोकशाही टिकवण्यासाठी सर्व लोकशाहीवादी शक्तींनी एकत्र येणे आणि एकत्र लढणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी बनली आहे, असे आवाहन त्यांनी केले.
​या संदर्भात काँग्रेस हाय कमांड महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेत्यांशी चर्चा करत असल्याच्या बातम्यांवर थोरात यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. माझ्याशी अद्याप या विषयावर वैयक्तिक पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नाही. जर माध्यमांकडे याविषयी काही वेगळी माहिती किंवा बातम्या येत असतील तर त्याबाबत मला कल्पना नाही, असे सांगत त्यांनी माध्यमांच्या भूमिकेवर अधिक बोलणे टाळले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, या छगन भुजबळ यांच्या विधानावर बोलताना थोरात म्हणाले की, छगन भुजबळ हे राजकारणातील एक अत्यंत ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत, एवढेच मला ठाऊक आहे; मात्र त्यावेळच्या अंतर्गत गोष्टींची मला माहिती नाही. दुसरीकडे, राजकारणात आणि प्रशासनात ‘नालायकपणा’ वाढल्याच्या गणेश नाईक यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना थोरात यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. दोष प्रत्येक ठिकाणी असतात, हे मान्य करत ते म्हणाले की, सध्याच्या सरकारमध्ये आणि राजकारणात दोष इतके वाढले आहेत की, आता त्यात काही ‘चांगले’ शोधण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. एकूणच थोरात यांच्या या विधानांमुळे राज्यातील आगामी राजकीय समीकरणांबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 510
बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरण शरद पवार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरातील प्रभाग क्रमांक ३…

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.