Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

सुफियाना सुरावटींनी संगमनेरकर रसिक मंत्रमुग्ध; ‘सजदा’ सोहळ्याने संगमनेर फेस्टिव्हलची रंगली तिसरी संध्याकाळ

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ऑपरेशन टायगर हा महाराष्ट्रातील राजकारणाच्या इतिहासातला काळा दिवस – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा संताप
राजकारण

ऑपरेशन टायगर हा महाराष्ट्रातील राजकारणाच्या इतिहासातला काळा दिवस – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा संताप

एका बाजूला प्रचंड आर्थिक राजकारण आणि दुसऱ्या बाजूला 'ईडी'ची भीती, या दुहेरी कचाट्यात सध्या राजकारण करणे कठीण झाले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

शिवसेनेचे सहा खासदार फोडण्यासाठी सत्ताधारी आघाडीने आखलेली ‘ऑपरेशन टायगर’ मोहीम म्हणजे राज्याच्या राजकारणातील काळा दिवस असल्याचा संताप राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. जून २०२२ मध्ये विधान परिषद निवडणुकांनंतर शिवसेनेत फूट पडली होती आणि त्यानंतर आता पुन्हा तीच गोष्ट शिवसेनेसोबत होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाने घेतलेली ही अधोगती म्हणजे एक काळा इतिहास ठरेल, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

भाजपवर विरोधी पक्ष फोडण्याचा आरोप करताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “लोटस, टायगर, लायन… मला त्या जनावरांची नावे माहिती नाहीत; पण शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षात विभाजन झाल्याच्या बातम्या येत आहेत. शिवसेनेच्या नऊपैकी सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिले आहे. त्यामुळे पक्षात फूट पडलेली स्पष्ट दिसत आहे.

त्यांनी पुढे आरोप केला की, नरेंद्र मोदी ‘डी-लिमिटेशन’ (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकात बदल करून उत्तर भारतीय राज्यांचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच महिला आरक्षणाच्या नावाखाली देशाचे संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात एकाच व्यक्तीची हुकूमशाही आणण्याचा हा प्रयत्न असून लोकशाहीसाठी हा काळा दिवस आहे.

एका बाजूला प्रचंड आर्थिक राजकारण आणि दुसऱ्या बाजूला ‘ईडी’ची भीती, या दुहेरी कचाट्यात सध्या राजकारण करणे कठीण झाले आहे. तुम्ही पक्षात आलात तर ‘खोके’ मिळतील, कंत्राटे मिळतील आणि त्यातून चाळीस टक्के कमिशन खा, असे भ्रष्ट राजकारण सुरू आहे. नरेंद्र मोदी सरकारचे एकमेव उद्दिष्ट सत्ता मिळवणे हेच आहे. आपण सुवर्ण महोत्सव, रौप्य महोत्सव, अमृत महोत्सव ऐकतो; पण मोदींचा हा १२ वर्षांचा उत्सव नेमका कशासाठी?” असा सवाल चव्हाण यांनी केला. तसेच देशाची अर्थव्यवस्था घसरत चालली असून महागाई प्रचंड वाढल्याचा आरोपही माजी मुख्यमंत्र्यांनी केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 283
पृथ्वीराज चव्हाण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – पारदर्शक कामकाज आणि गुणवत्तेच्या जोरावर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी…

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

सुफियाना सुरावटींनी संगमनेरकर रसिक मंत्रमुग्ध; ‘सजदा’ सोहळ्याने संगमनेर फेस्टिव्हलची रंगली तिसरी संध्याकाळ

19/09/2026

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.