Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत
सामाजिक

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

योजनेच्या अधिक माहितीसाठी नागरिकांनी ८६०५३२११६७ या संपर्क क्रमांकावर संवाद साधावा, असे यशोधन कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर:

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ या जनसंपर्क कार्यालयात नागरिकांसाठी एसटी स्मार्ट कार्ड योजनेची सुविधा अधिक प्रभावीपणे सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी नागरिकांनी ८६०५३२११६७ या संपर्क क्रमांकावर संवाद साधावा, असे यशोधन कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

राज्याचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमदार सत्यजित तांबे, इंद्रजीत थोरात आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नियोजनातून तालुक्यातील नागरिकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ तातडीने मिळवून देण्यासाठी यशोधन कार्यालय सातत्याने कार्यरत असते.

या कार्यालयात मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या स्वतंत्र कक्षाच्या माध्यमातून आजवर अनेक ज्येष्ठ नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळवून देण्यात आला असून, ही प्रक्रिया यापुढेही अविरत सुरू राहणार असल्याची माहिती डॉ. नितीन भांड व संजय कोल्हे यांनी दिली आहे.

परिवहन विभागाच्या सहकार्याने राबवल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के मोफत प्रवासाची सोय आहे, तर ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलतीत प्रवास करता येणार आहे. याचसोबत महिला सन्मान योजनेअंतर्गत सर्व महिला आणि विद्यार्थिनींना एसटी प्रवासाच्या तिकिटात ५० टक्के सूट देण्यात येत आहे. प्रवासाच्या सवलतींसोबतच, महाविद्यालयीन विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षांची उत्तम तयारी करता यावी यासाठी डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून यशोधन कार्यालयात स्वतंत्र ग्रंथालयही सुरू करण्यात आले असून, सध्या अनेक विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत.

या कल्याणकारी योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थिनींनी स्वतः यशोधन कार्यालयातील स्वतंत्र कक्षाला भेट देणे आवश्यक आहे. अर्ज करताना नागरिकांनी आपले ओळखपत्र, मतदान कार्ड आणि मोबाईल नंबर सोबत बाळगावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 940
एसटी स्मार्ट कार्ड बाळासाहेब थोरात यशोधन जनसंपर्क कार्यालय सुविधा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने…

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.