Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बाळासाहेब थोरातांचे मध्य प्रदेशात ‘मिशन वोट बचाव’! राहुल गांधींच्या अभियानासाठी ५ जिल्ह्यांत बैठकांचा धडाका, भोपाळमध्ये पत्रकार परिषद; रायसेन, विदिशा आणि राजगढमध्येही काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा

24/10/2026

सरपंच ते सहकार क्षेत्रातील दिग्गज; भानूदास कोतकर यांची प्राणज्योत मालवली

24/10/2026

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर मद्यविक्रीचा पर्दाफाश; अ‍ॅपल मोबाईल, आलिशान कारसह ६ लाखांचा ऐवज जप्त!

24/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बाळासाहेब थोरातांचे मध्य प्रदेशात ‘मिशन वोट बचाव’! राहुल गांधींच्या अभियानासाठी ५ जिल्ह्यांत बैठकांचा धडाका, भोपाळमध्ये पत्रकार परिषद; रायसेन, विदिशा आणि राजगढमध्येही काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा
राजकारण

बाळासाहेब थोरातांचे मध्य प्रदेशात ‘मिशन वोट बचाव’! राहुल गांधींच्या अभियानासाठी ५ जिल्ह्यांत बैठकांचा धडाका, भोपाळमध्ये पत्रकार परिषद; रायसेन, विदिशा आणि राजगढमध्येही काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा

थोरातांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या अनेक जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. मध्य प्रदेशचा दौरा पूर्ण करून परतल्यानंतर, अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या उर्वरित जागांच्या प्रचारातही बाळासाहेब थोरात पूर्ण ताकदीने उतरणार आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
देशभरात गाजत असलेल्या ‘मतचोरी’च्या मुद्यावर काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारविरोधात जोरदार आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘वोट बचाव, देश बचाओ’ या अभियानाला गती देण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य माजी आमदार बाळासाहेब थोरात तीन दिवसांच्या मध्य प्रदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत.
शनिवार २४ ऑक्टोबर ते सोमवार २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ते भोपाळ, रायसेन, विदिशा, राजगढ आणि सिहोर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचा दौरा करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
केंद्रातील भाजप सरकारच्या काळात देशात वाढलेली महागाई, बेरोजगारी आणि जातीयवादामुळे सर्वसामान्य नागरिक, तरुण आणि महिलांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाचा वापर करून केंद्र व राज्य सरकारने मतचोरी केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात याविरोधात आवाज उठवला जात असून, महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले आहे. आता देशाची लोकशाही ताकदवान करण्यासाठी आणि राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी थोरात थेट मध्य प्रदेशात जाऊन अभियानाची धुरा सांभाळणार आहेत.
आपल्या तीन दिवसीय दौऱ्यात रविवारी बाळासाहेब थोरात भोपाळ येथे महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसची आक्रमक भूमिका मांडणार आहेत. त्यानंतर भोपाळ शहर काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीला ते उपस्थित राहतील. दुपारी रायसेन जिल्ह्यात जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक आणि पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर, संध्याकाळी विदिशा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आणि पत्रकार परिषद घेणार आहेत. यानंतर सोमवारी ते राजगढ आणि सिहोर जिल्ह्यात जाऊन स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करतील व दोन्ही ठिकाणी पत्रकार परिषदांना संबोधित करतील.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतही बाळासाहेब थोरात यांच्या कुशल नेतृत्वाखाली काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीने चमकदार कामगिरी केली आहे. थोरातांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या अनेक जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. मध्य प्रदेशचा दौरा पूर्ण करून परतल्यानंतर, अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या उर्वरित जागांच्या प्रचारातही बाळासाहेब थोरात पूर्ण ताकदीने उतरणार आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 151
बाळासाहेब थोरात मत चोरी मध्यप्रदेश राजकारण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

हा तर लोकशाहीचा खून – 500 कोटी आले कुठून?राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

23/10/2026

लोहारे येथील आवजीनाथ बाबा देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार; आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते २० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण

22/10/2026

बाळासाहेब थोरातांचा राज्य सरकारला मोठा इशारा: ‘कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात तातडीने चारा छावण्या सुरू करा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल!’

21/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

बाळासाहेब थोरातांचे मध्य प्रदेशात ‘मिशन वोट बचाव’! राहुल गांधींच्या अभियानासाठी ५ जिल्ह्यांत बैठकांचा धडाका, भोपाळमध्ये पत्रकार परिषद; रायसेन, विदिशा आणि राजगढमध्येही काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा

By Annant Ppangarkar24/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात गाजत असलेल्या ‘मतचोरी’च्या मुद्यावर काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारविरोधात जोरदार आक्रमक…

सरपंच ते सहकार क्षेत्रातील दिग्गज; भानूदास कोतकर यांची प्राणज्योत मालवली

24/10/2026

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर मद्यविक्रीचा पर्दाफाश; अ‍ॅपल मोबाईल, आलिशान कारसह ६ लाखांचा ऐवज जप्त!

24/10/2026

महाराष्ट्र संवाद न्यूज विशेष: दुष्काळाची सावली अन साडेचार टीएमसी पाण्याची उधळपट्टी! अकोले-संगमनेरमध्ये संतापाचा उद्रेक; सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्ताने निळवंडेचा खेळखंडोबा?

24/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.