Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे राहावा यासाठी आग्रही; माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे
राजकारण

शिर्डी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे राहावा यासाठी आग्रही; माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे

शिर्डी लोकसभेसाठी संगमनेरमध्ये काँग्रेसची आढावा बैठक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/08/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

एकमुखी मागणी – माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पुन्हा सन्मानाने पक्षात घ्या!

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा जनाधार आहे या जागेसाठी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक देखील अनेक जण आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहावा यासाठी आग्रही असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे निरीक्षक चंद्रकांत हंडोरे यांनी केले.

आढावा बैठकीला हे होते उपस्थित: हंडोरे यांच्या उपस्थितीत संगमनेरमध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीसाठी श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते, ज्ञानेश्वर गायकवाड, करण ससाने, हेमंत ओगले, समन्वयक सचिन गुंजाळ, डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन गुजर, ज्ञानदेव वाफारे, राजेंद्र वाघमारे, अशोक कानडे, सोन्याबापु वाकचौरे, मीनानाथ पांडे, सुरेश थोरात, मिलिंद कानवडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे आदी उपस्थित होते.

हंडोरे म्हणाले, कोअर कमिटीच्या सूचनेवरून राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाच्या जागांचा आढावा घेण्यासाठी बैठका सुरू आहेत. कोणत्या मतदारसंघात कोणाचे प्राबल्य आहे त्यानुसार जागांची विभागणी केली जाणार आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात काँग्रेसला चांगले वातावरण असल्याने हा मतदारसंघ काँग्रेसकडे असायला हवा. हा मतदारसंघ काँग्रेसने लढवावा यासाठी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. यासाठी पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात व स्क्रीनिंग कमिटी मार्फत योग्य निर्णय घेतला जाईल.

तरुणांना पक्षात संधी: पक्ष तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे राज्यात सध्या भाजप विरोधात परिवर्तनाची लाट असल्याने राज्यातून सर्वाधिक काँग्रेस खासदार निवडून देण्याचा मानस आहे. खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपकडून काँग्रेस पक्षाला बदनाम केले जात आहे. उद्योगधार्जिने धोरण राबवत भाजप जातीयवाद, धर्मवाद, प्रांतवाद या माध्यमातून राजकारण करत असून विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम सुरू आहे. काँग्रेसमध्ये तरुणांना मोठी संधी आहे.

आमदार कानडे म्हणाले, शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेससाठी सकारात्मक वातावरण आहे. भाजप जाणीवपूर्वक जातीवादाचे राजकारण करत असून लोकशाहीसाठी हे धोक्याचे आहे. आमदार थोरात यांच्या माध्यमातून येत्या काळात काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येणार आहेत.

नागवडे म्हणाले, इतर पक्षातील घडामोडी बघता शिर्डी लोकसभा मतदारसंघात अस्वस्थता निर्माण झाली असून काँग्रेस पक्षासाठी अनुकूल वातावरण आहे. आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार विजयी होणार असून पक्षात नवचैतन्य निर्माण होईल.

दुर्गाताई तांबे म्हणाल्या, शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून अनेक इच्छुक उमेदवार असले तरी यावेळी ही उमेदवारी महिलांना देण्याबाबत विचार व्हायला हवा. काँग्रेस पक्षाशी आपण एकनिष्ठ असून पुढील काळातही एकनिष्ठ राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यांनी देखील मांडली मत: यावेळी करण ससाने, हेमंत ओगले, उत्कर्षा रूपवते, सचिन गुंजाळ, ज्ञानदेव वाफारे, एकनाथ गोंदकर, सचिन गुजर, पंकज लोंढे, मीनानाथ पांडे, तुषार पोटे आदींनी बैठकीत आपली मते मांडली. अजय फटांगरे, सुनंदा जोर्वेकर, पद्मा थोरात, बेबी थोरात, के. के. थोरात, सुधीर नवले, ज्ञानेश्वर मुरकुटे, निखिल पापडेजा, रमेश गफले आदी उपस्थित होते.

आढावा बैठकीत एकमुखी ठराव डॉ. तांबे यांना सन्मानाने काँग्रेसमध्ये घ्या…

संगमनेर मध्ये झालेल्या बैठकीत काँग्रेसचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पुन्हा पक्षात संधी मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यामुळे तांबे यांना सन्मानाने काँग्रेसमध्ये घ्यावे यासाठी या बैठकीत ठराव देखील करण्यात आला असून निरीक्षक हंडोरे यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत ही मागणी प्रदेश काँग्रेसकडे कळविण्यात येणार असल्याचे सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 705
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.