महाराष्ट्र संवाद न्यूज
नवी दिल्ली – स्वातंत्र्य दिनापासून केंद्र सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. सरकारने नेहरू स्मारकाचे नाव बदलले असून यापुढे नेहरू स्मारकाला पंतप्रधान म्युझियम अँड लायब्ररी (पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी) म्हटले जाईल. आधीच्या नावातून नेहरूंचे नाव हटविण्यात आले आहे.
जून महिन्यात झाला होता निर्णय: स्वातंत्र्यदिनी नाव बदलण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली आहे. जून महिन्यात नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी सोसायटीच्या विशेष बैठकीत त्याचे नाव बदलून पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी (पंतप्रधान म्युझियम अँड लायब्ररी PMML) असे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
नृपेंद मिश्रा हे पंतप्रधान म्युझियम आणि लायब्ररीच्या कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष आहेत. मिश्रा यापूर्वी पंतप्रधान मोदींचे मुख्य सचिव होते. PMML चे उपाध्यक्ष ए सूर्य प्रकाश यांनी ट्विटरवर नाव बदलल्याची पुष्टी केली.
सूर्यप्रकाश यांचे ट्विट: ए सूर्य प्रकाश यांनी ट्वीटमध्ये लिहिलयं की, नेहरू ममोरियल म्युझियम अँड लायब्ररी आता 14 ऑगस्ट 2023 पासून पंतप्रधानांचे संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी आहे, समाजाच्या कार्यक्षेत्रातील लोकशाहीकरण आणि विविधीकरणाच्या अनुषंगाने स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.
का बदललं नाव: संस्थेचं नाव स्वतंत्र भारतातील लोकशाहीचा एकत्रित प्रवास आणि राष्ट्र उभारणीत प्रत्येक पंतप्रधानाचे योगदान दर्शवणाऱ्या नवीन संग्रहालयासह चालू उपक्रमांचे प्रतिबिंब असावं, असं पीएम म्युझियम अँड लायब्ररीच्या कार्यकारी परिषदेला वाटत होतं. त्यानंतर नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. संग्रहालय आता अद्यावत करण्यात आलं आहे.
नाव बदलल्याने नेहरूंचं महत्व कमी होणार नाही: नेहरू मेमोरियल म्युझियमच नाव बदलल्याने काँग्रेसने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ज्यांचा कोणताही इतिहास नाही, ते दुसऱ्यांचा इतिहास मिटवत आहेत. परंतु नाव बदलल्याने माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाला नेहरू यांचं महत्त्व कमी होणार नाही, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी म्हटलं आहे.

