Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उद्धव साहेब! शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या वाकचौरेना पुन्हा पक्षात प्रवेश नको; गद्दार नको आम्हाला निष्ठावंत हवा, शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय… दक्षिणेतील ‘त्या’ पदाधिकाऱ्यांनी उत्तरेत वाद लावण्याचे काम करू नये
राजकारण

उद्धव साहेब! शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या वाकचौरेना पुन्हा पक्षात प्रवेश नको; गद्दार नको आम्हाला निष्ठावंत हवा, शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय… दक्षिणेतील ‘त्या’ पदाधिकाऱ्यांनी उत्तरेत वाद लावण्याचे काम करू नये

प्रवेशा आधीच वाकचौरे यांना नाराजीचा फटका बसण्याची चिन्हे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/08/2023Updated:20/08/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – शिवसेनेने खासदारकीची संधी दिल्यानंतर शिवसेनेसोबत गद्दारी करत अपक्ष-भाजप असा प्रवास करीत पुन्हा उमेदवारीसाठी शिवसेनेत येण्याच्या तयारीत असलेल्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रवेशाला उत्तर नगर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. उद्धव साहेब! “आम्हाला गद्दार नको, निष्ठावंत हवा” असा आवाज देतानाच नगर दक्षिणेतील त्या नाराज पदाधिकाऱ्याने उत्तरेत वाद लावण्याचे काम करू नये, असा सल्लादेखील देण्यात आला.

जागा गमावण्यासाठी नाराजांची खेळी: राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडीनंतर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री शिंदे गटाची वाट धरली आहे. भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्याची खात्री पटल्याने माजी खासदार 2024 च्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी डोळ्यासमोर ठेवून पुन्हा शिवसेना प्रवेशाच्या तयारीत आहे. शिंदे गटाच्या वाटेवर असलेल्या काही जुन्या म्हणविल्या जाणाऱ्या पदाधिकारी-शिवसैनिकांचे त्यांच्या उमेदवारीला समर्थन असल्याने शिवसेनेत दोन गट पडले आहेत. अशा परिस्थितीत दक्षिणेतील काही नाराज पदाधिकारी उत्तरेतील हक्काच्या जागेवर पुन्हा गद्दार वाकचौरे यांना उभे करून पक्षांतर्गत वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे.

का झाली बैठक: या पार्श्वभूमीवर संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी उत्तर नगर जिल्ह्यातील पदाधिकारी शिवसैनिकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. उत्तर नगर जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे व मुजीब शेख माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यासह संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, अकोले तालुक्यातील पदाधिकारी शिवसैनिक बैठकीसाठी उपस्थित होते. सर्वांनीच या बैठकीत वाकचौरे यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध दर्शविला. लोकसभा विधानसभा निवडणुकीत निष्ठावंत शिवसेना उमेदवाराच्या विजयासाठी एकजुटीने प्रयत्न करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्याचा निर्णय घेतला.

पक्षप्रमुखांना भेटणार: बैठकीत पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी गद्दार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पुन्हा पक्ष प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त दर्शवत रोष व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुखांनी शिवसेनेसोबत सातत्याने गद्दारी करणाऱ्या वाकचौरे यांना पक्षात घेऊ नये, मतदार संघातील पदाधिकारी शिवसैनिकांचे मान्य ऐकल्याशिवाय निर्णय घेऊ नये यासाठी बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विनवणी करीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संपर्कप्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप व संपर्क नेत्यांनी लवकरात लवकर भेटीची वेळ देण्याची मागणी करण्यात आली.

गद्दारीचा वाचला पाढा: बैठकीत पदाधिकाऱ्यांनी वाकचौरे यांच्या गद्दारीचा पाढाच वाचून दाखविला. लोकसभेत दोनदा व विधानसभेत एकदा पराभूत झालेल्या नव्हे तर अनामत जप्त झालेल्या, खोट्या शपथा घेऊन साईबाबांना फसविणाऱ्या, शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदारांना फसविणाऱ्या तसेच ऐनवेळी पक्षासोबत गद्दारी करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फसविणाऱ्या भाऊसाहेब वाकचौरे यांच्या संभाव्य प्रवेशाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

एकदा नव्हे तर तीनदा गद्दारी: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना आणि मुख्यमंत्रीपदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असताना 40 गद्दारांनी गद्दारी करत सरकार पाडले. त्यांनी एकदा गद्दारी केली, मात्र वाकचौरे यांनी पक्षासोबत तीनदा गद्दारी केली आहे. या गद्दाराला कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेत प्रवेश देणार नसल्याचे विधान पक्षप्रमुख ठाकरे यांनी केले होते. मात्र पुन्हा खासदारकीच्या लोभाने शिवसेनेत येणाऱ्या या गद्दाराला दक्षिणेतील काही नाराजांच्या पाठिंब्याने संधी देऊ नये. दक्षिणेतील या नाराज पदाधिकाऱ्यांनी आता दिल्या घरी सुखी राहावे. उत्तरेतील काही नाराजांना हाताशी धरून वाकचौरे यांच्या उमेदवारीचा खटाटोप करू नये. उत्तर नगर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे वाद लावू नये. उत्तर नगर जिल्ह्यात शिवसेना अतिशय चांगल्या प्रकारे व स्वाभिमानाने काम करत असून त्या नेत्याप्रमाणे ‘शेजारच्या पाटलाच्या’ तालावर नाचणारी नसल्याचे म्हटले आहे.

जागा गमावण्याची चिन्हे: वाकचौरे यांच्या प्रवेशामागील जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांची चाल लक्षात घेता वाकचौरे यांच्या पक्षप्रवेशातून शिवसेना ही जागा गमावण्याची चिन्हे अधिक असल्याने संगमनेरमध्ये झालेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी शिवसैनिकांच्या बैठकीची दखल वरिष्ठ पातळीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेऊन वाकचौरे यांचा पक्षप्रवेश थांबविणार का? याकडे उत्तरेतील शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांसह मतदारांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 695
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.