Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

June 4, 2026

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

June 4, 2026

आज गुरुवार, ४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डी लोकसभा मतदार संघासंदर्भात बाळासाहेब थोरात यांचे महत्त्वाचे विधान…
राजकारण

शिर्डी लोकसभा मतदार संघासंदर्भात बाळासाहेब थोरात यांचे महत्त्वाचे विधान…

अद्याप जागावाटप निश्चित नाही
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 7, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

निवडून येण्याची क्षमता, मतदार संघाची परिस्थिती बघून मविआच्या बैठकीत निर्णय होणार

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – महाविकास आघाडीमध्ये लोकसभेसाठी राज्यातील 48 जागांवर चर्चा होईल त्यावेळी जागा वाटपा संदर्भातील निर्णय घेतला जाईल. निवडून येण्याची क्षमता मतदार संघाची परिस्थिती बघून निर्णय घेतला जाणार असल्याचे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

पत्रकार परिषद: काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात संदर्भात गुरुवारी संगमनेरमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत यासंबंधी महत्त्वाचे विधान केले.

थोरात म्हणाले, राज्यातील 48 जागा संदर्भात चर्चा होईल. त्यानंतर काही गोष्टी ठरतील. कोणी उमेदवारी जाहीर केली असं आज म्हणू शकत नाही. महाविकास आघाडी म्हणून शिर्डीच्या जागेचा निर्णय घेतला जाईल.

वाकचौरे उमेदवार असतील का? शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवारी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते शिर्डी लोकसभा मतदारसंघात कोपरगाव संगमनेरमध्ये भेटी देणार आहेत. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेत पुन्हा प्रवेश केल्याने तसेच संभाव्य उमेदवार म्हणून वाकचौरे यांच्या नावाची चर्चा शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी सुरू आहे, या पार्श्वभूमीवर थोरात यांना प्रश्न विचारला असता त्यांनी वरील विधान केले.

सेना की काँग्रेस: थोरात यांच्या विधानामुळे शिर्डी लोकसभा मतदार संघाची जागा शिवसेनेकडे राहते की नव्याने होणाऱ्या जागा वाटपामध्ये ही जागा काँग्रेसला मिळते, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. ही जागा काँग्रेसला मिळाल्यास माजी खासदार वाकचौरे शिवसेनेत राहणार की पुन्हा शिवसेनेची बंडखोरी करत उमेदवारी करणार हेही लवकरच स्पष्ट होईल. जागा वाटपात जागा शिवसेनेकडे राहिल्यास या जागेवर वाकचौरे यांनी कोणी हे देखील महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीनंतर स्पष्ट होणार असल्याचे दिसते.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,030
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

महायुतीत बंडखोरीची चिन्हे; शिवसेनेचं डोकं उडवण्याचं काम भाजप करत आहे: अब्दुल सत्तार यांच्या आरोपाने महायुतीत खळबळ

June 1, 2026

“81 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून सरकारची मोठी फसवणूक; महिलांच्या विश्वासाला तडा” – बाळासाहेब थोरातांचा घणाघात

June 1, 2026

८१ लाख महिलांना वगळले; बँक पडताळणीनंतर ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये मोठी कपात

June 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पत्रकारिता

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

By अनंत पांगारकरJune 4, 20260

संपादकीय अहिल्यानगरच्या राजकारणात सध्या शिवसेना, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील घडामोडी वेगाने बदलत आहेत.…

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

June 4, 2026

आज गुरुवार, ४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 4, 2026

संगमनेर पालिकेच्या कारवाई विरोधात शिंदे शिवसेना आक्रमक; भाजीची पाटीच मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात नेत नगरसेविका साक्षी सूर्यवंशींचे ‘गांधीगिरी’ आंदोलन

June 3, 2026

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.