Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा पावसात संगमनेरमध्ये दुष्काळग्रस्तांशी संवाद! म्हणाले आपण सरकारला एक मुदत देऊ, काही झाले नाही तर…
राजकारण

माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा पावसात संगमनेरमध्ये दुष्काळग्रस्तांशी संवाद! म्हणाले आपण सरकारला एक मुदत देऊ, काही झाले नाही तर…

संगमनेरच्या ग्रामीण भागातही ठाकरेंची क्रेझ कायम
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर

संगमनेर – “तुम्ही कोणी धीर सोडू नका. संपूर्ण शिवसेना ताकदीने तुमच्यासोबत आहे. सरकारला एक मुदत देऊ. यात काही नाही झाले, तर मग आपण आंदोलन असेल, अथवा जे काय करावे लागेल, ते करू” अशा शब्दात माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुष्काळग्रस्तांची संवाद साधत आपल्या शिवसैनिकांना, कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांसोबत राहण्याचा सल्ला दिला.

रिमझिम पावसात संवाद: संगमनेर, कोपरगाव, शिर्डीच्या दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर सोबत पाऊस घेऊनच आलेले शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिमझिम पावसातच शुक्रवारी संगमनेर तालुक्यातील वडझरी येथील दुष्काळग्रस्तांशी संवाद साधत शेतकऱ्यांना धीर दिला.

नुकसानीची घेतली माहिती: शेताच्या बांधावरच दुष्काळग्रस्तांसोबत संवाद साधताना त्यांनी येथील पीक परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पिक विमा, नुकसान भरपाईबाबत माहिती विचारली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे पंचनामे कधी होणार यासंदर्भात मला माहिती द्या. किंवा नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करायला लोक येतात की नाही, पिक विम्याचे पैसे मिळतात की नाही मिळत, याबाबत मला पाच-दहा लोकांनी मुंबईत भेटून माहिती द्यावी. सरकारकडून यासंदर्भात काय हालचाली होतात ते बघूया.

संवाद: ठाकरे यांनी शेतकऱ्यांना विचारले की, या हंगामात तुम्हाला किती वेळा पेरण्या कराव्या लागल्या. यावर शेतकऱ्यांनी दोन वेळा पेरणी करावी लागल्याचे सांगितले. यावर ठाकरे म्हणाले, तुम्ही दोन वेळा पेरणी केली. तुमच्या डोक्यावर पुन्हा कर्ज वाढले. पीक विम्याचे तुम्ही हप्ते भरले होते का? तुम्हाला आता विम्याचे पैसे मिळालेत का? गेल्या वर्षीची नुकसान भरपाई देखील मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी ठाकरे यांना सांगितले.

यांची उपस्थिती: यावेळी ठाकरे यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत, सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मुजीब शेख व प्रमोद लबडे, संगमनेर शहर प्रमुख अमर कतारी, संगमनेर तालुका प्रमुख भाऊसाहेब हासे आदींसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 810
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.