Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026

सहा मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जण ताब्यात

June 4, 2026

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर-शिर्डी दौऱ्यानंतर विजयाची खात्री असलेल्या शिर्डीत उद्धव ठाकरे यांना धक्का; उपनेते बबनराव घोलप यांचा राजीनामा
राजकारण

संगमनेर-शिर्डी दौऱ्यानंतर विजयाची खात्री असलेल्या शिर्डीत उद्धव ठाकरे यांना धक्का; उपनेते बबनराव घोलप यांचा राजीनामा

उद्धव ठाकरे यांना व्हाट्सअपद्वारे पाठविला राजीनामा
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 10, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

नाशिक – उपनेते आणि शिर्डीचे संपर्कप्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप यांनी पुनर्बांधणी केलेल्या आणि विजयाची खात्री असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरे यांना रविवारी मोठा धक्का बसला. ठाकरेंनी शिर्डीत केलेल्या बदलानंतर उपनेते बबनराव घोलप यांनी आपला राजीनामा ठाकरे यांना पाठविला असल्याची माहिती समोर येत आहे.

नाराजी: एकीकडे जळगावच्या दौऱ्यावर असलेल्या ठाकरे यांना दुसरीकडे शिर्डीतून हा मोठा धक्का मानला जात आहे. ठाकरे संगमनेर-शिर्डी दौऱ्यावरून जळगावमध्ये जात नाही तोच शिर्डीत नव्या संपर्कप्रमुखांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय शिवसेनेसोबत गद्दारी करत काँग्रेस, भाजपची साथ केलेल्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश देऊन उमेदवारी देण्याचे निश्चित मानले जात असल्याने बबनराव घोलप आणि त्यांचे समर्थक पदाधिकारी, शिवसैनिक नाराज असल्याची चर्चा होती.

राजीनामा: याच कारणामुळे घोलप यांनी नाराजीतून राजीनामा दिला आसावा असं सांगितलं जात आहे. दरम्यान, बबनराव घोलप सध्या आऊट ऑफ कव्हरेज आहेत. उद्धव ठाकरेंचे विश्वासू अशी बबनराव घोलप यांची ओळख आहे. माजी मंत्री असलेले बबन घोलप हे देवळाली मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 95 मध्ये भाजप शिवसेना सरकारमध्ये ते मंत्री होते.

शिर्डीची जबाबदारी सोपविली होती: शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी बबनराव घोलप यांना शिर्डीतून लोकसभेच्या उमेदवारीचे आश्वासन दिले होते. घोलप यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघात संपर्क प्रमुख नेमून नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या उद्धव यांनी सूचना दिल्या होत्या.

वाकचौरे यांना विरोध: मात्र उद्धव ठाकरे यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीवर परस्पर शिक्कामोर्तब केल्याने बबनराव घोलप अस्वस्थ होते. यानंतर बबनराव घोलप यांनी मातोश्रीवर धाव घेतली होती. उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली होती. तसंच वाकचौरे यांच्या संभाव्य उमेदवारीला देखील विरोध केला होता.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,220
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

महायुतीत बंडखोरीची चिन्हे; शिवसेनेचं डोकं उडवण्याचं काम भाजप करत आहे: अब्दुल सत्तार यांच्या आरोपाने महायुतीत खळबळ

June 1, 2026

“81 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून सरकारची मोठी फसवणूक; महिलांच्या विश्वासाला तडा” – बाळासाहेब थोरातांचा घणाघात

June 1, 2026

८१ लाख महिलांना वगळले; बँक पडताळणीनंतर ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये मोठी कपात

June 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

By अनंत पांगारकरJune 4, 20260

विशेष प्रतिनिधी | संगमनेर: शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांच्या अतिक्रमणांवर पालिकेने धडक कारवाईचा बडगा…

सहा मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जण ताब्यात

June 4, 2026

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

June 4, 2026

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.