Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026

सहा मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जण ताब्यात

June 4, 2026

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राजीनाम्याबद्दल बबनराव घोलप यांनी केली भूमिका स्पष्ट; मिलिंद नार्वेकरांवरही केला आरोप
राजकारण

राजीनाम्याबद्दल बबनराव घोलप यांनी केली भूमिका स्पष्ट; मिलिंद नार्वेकरांवरही केला आरोप

वाकचौरे यांच्या प्रवेशावरून पक्षात दुफळी
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 11, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

घोलप यांच्या पाठोपाठ शिर्डीतून पदाधिकारी ही राजीनाम्याच्या तयारीत!

महाराष्ट्र संवाद न्यूज

नाशिक – त्या ४० लोकांनी बंडखोरी केली, ते आमदार, खासदार पुन्हा निवडून येता कामा नये, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यासाठी त्यांनी मला अमरावती किंवा शिर्डी यापैकी एका लोकसभा मतदारसंघाची निवड करायला सांगितले होते. मी शिर्डीची निवड केली, पण तिथे गद्दार वाकचौरेंना उमेदवारी जाहीर केली. त्यांना उमेदवारी द्यायची होती, मग मला का तयारी करायला सांगितले? असा सवाल करीत माजीमंत्री घोलप यांनी आपली नाराजी जाहीर केली.

उपनेतेपदाच्या राजीनाम्याची घोषणा: बबनराव घोलप यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत मी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिलेला असल्याचे जाहीर केले.

३५ शाखांची स्थापना: शिर्डी लोकसभा मतदारसंघात मला संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी दिल्याने कामाला लागलो होतो. मी संपर्कप्रमुख झाल्यावर चांगली तयारी केली. मला कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसला पण पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह दिसत नव्हता. त्यामुळे त्यात बदल केला, पण त्याला मुंबईतून स्थगिती दिली. यानंतरही काम सुरु होते. ३५ शाखांची स्थापना केली होती.

ठाकरेंच्या दौऱ्याची कल्पना नव्हती: उद्धव ठाकरे यांचा नुकताच शिर्डी दौरा झाला, त्या दौऱ्याची माहिती मला देण्यात आली नव्हती. दौरा मला कळवण्यात आला नाही. भाऊसाहेब वाकचौरे गद्दार होते ते शिवसेना सोडून गेले होते. वाकचौरेंनी कोर्टात केलेल्या केसेस सुरु आहेत पण त्याला पक्षात घेतले. ते वाकचौरे आता प्रचार करत असताना, कार्यकर्ते संभ्रमात आहेत. वाकचौरेंना जर उमेदवार करायचे होते, तर मला का सांगितलं? असा सवाल बबनराव घोलप यांनी केला.

नार्वेकर वाकचौरे यांना पुढे ढकलत होते: उद्धव ठाकरे यांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यात वाकचौरे यांनाच पुढे पुढे करण्यात आले. जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे कॅमेऱ्याजवळ जात होते त्यावेळी मिलिंद नार्वेकर वाकचौरेंना पुढं ढकलत होते. त्यानंतर मी घरी गेलो उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार होतो पण दुसऱ्याच दिवशी सामनामध्ये माझं संपर्कपद काढून घेतल्याचे छापून आले. माझ्याशी अशी वागणूक असेल तर शिवसैनिकांचं काय असेल म्हणून मी हातानं राजीनामा लिहिला आणि व्हाटसअपवर राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला, असं बबनराव घोलप म्हणाले.

पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची शक्यता: दरम्यान घोलप यांनी राजीनामा दिल्याने शिर्डीतील संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहता येथील पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. घोलप यांच्या भूमिकेकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले असून ते देखील राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

मी उद्धव ठाकरे यांना राजीनामा पाठवला आहे. खासदार संजय राऊत यांनी मला बोलावलं आहे. मी त्यांच्या भेटीला जाणार आहे. मी गेली ५५ वर्ष शिवसेनेत काम करतो आहे. १९६८ ला माझ्या शाखेचं उद्घाटन बाळासाहेब ठाकरे यांनी केलं आहे. मी ५५ वर्षे झाले, शिवसेनेत काम करत आहे, त्यांनी मला काढून टाकावं, मी बाहेर जाणार नाही.

– बबनराव घोलप

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 896
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

महायुतीत बंडखोरीची चिन्हे; शिवसेनेचं डोकं उडवण्याचं काम भाजप करत आहे: अब्दुल सत्तार यांच्या आरोपाने महायुतीत खळबळ

June 1, 2026

“81 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून सरकारची मोठी फसवणूक; महिलांच्या विश्वासाला तडा” – बाळासाहेब थोरातांचा घणाघात

June 1, 2026

८१ लाख महिलांना वगळले; बँक पडताळणीनंतर ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये मोठी कपात

June 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

By अनंत पांगारकरJune 4, 20260

विशेष प्रतिनिधी | संगमनेर: शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांच्या अतिक्रमणांवर पालिकेने धडक कारवाईचा बडगा…

सहा मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जण ताब्यात

June 4, 2026

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

June 4, 2026

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.