Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आगामी निवडणुकीत कोणतही पोस्टर, बॅनर लावणार नाही… कोणालाही लक्ष्मी दर्शन नाही… मी कधीही लाच घेतली नाही, घेऊही देणार नाही… इतकच काय कोणालाही चहा पाजणार नाही; प्रदेशाध्यक्षांनाच नितीन गडकरींचा घरचा आहेर
राजकारण

आगामी निवडणुकीत कोणतही पोस्टर, बॅनर लावणार नाही… कोणालाही लक्ष्मी दर्शन नाही… मी कधीही लाच घेतली नाही, घेऊही देणार नाही… इतकच काय कोणालाही चहा पाजणार नाही; प्रदेशाध्यक्षांनाच नितीन गडकरींचा घरचा आहेर

वाशिम येथील सभेत नितीन गडकरी यांचे वक्तव्य
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

“आगामी निवडणुकीत आपण कोणतेही बॅनर किंवा पोस्टर लावणार नाही. कोणालाही लक्ष्मी दर्शन करणार नाही. मी कधीही लाच घेतली नाही, कोणाला घेऊही देणार नाही. इतकच काय आपण कोणालाही चहा पाजणार नसल्याचं” केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केल आहे.

यांची उपस्थिती : यावेळी खासदार भावना गवळी, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार राजेंद्र पाटणी, लखन मलिक, अमित झनक, तानाजी मुटकुळे यांच्यासह जिल्हाधिकारी एस. भुवनेश्वरी आदी उपस्थित होते. नितीन गडकरी यांनी भाजपा चंद्रशेखर बावनकुळेंना घरचा आहेर दिल्याची चर्चा यामुळे केली जात आहे.

लोकार्पण सोहळा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वाशीम येथे 3655 कोटी रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते.

गडकरी म्हणाले, आगामी निवडणुकीत मी कोणत्याही पोस्टर बॅनर लावणार नाही इतकंच काय आपण कोणालाही चहा पाजणार नसल्याचे सांगत आपण जनतेचे काम प्रामाणिकपणे करणार असल्याचं मंत्री नितीन गडकरींनी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

गडकरी संतापले : वाशिम जिल्ह्यात येताना खराब रस्ते बघून संतापलेले गडकरी म्हणाले, जिल्ह्यात सिमेंटचे दर्जेदार रस्ते बांधून देतो. या सिमेंटच्या रस्त्यावर पुढील पन्नास वर्षे खड्डे पडणार नाहीत. यापूर्वी वाशिम जिल्ह्यात एकही राष्ट्रीय महामार्ग नव्हता. मात्र आता 228 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग करण्यात आला आहे. त्यामुळे वाशिम जिल्हा आता राष्ट्रीय महामार्ग सोबत जोडला गेला आहे.

सरकारची दहा वर्ष आणि दहा हजार कोटीची जिल्ह्यात कामे : गडकरी यांच्या हस्ते 3655 कोटी रुपयांचे विकासकामांचा लोकार्पण करण्यात आलं याशिवाय 595 कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आलं, या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, सरकारला दहा वर्षे पूर्ण होण्याआधी वाशिम जिल्ह्यात दहा हजार कोटी रुपयांची कामे झालेली असतील.

पत्रकारांना ढाब्यावर चहा पाजायला न्या म्हणणाऱ्या नेत्याला गडकरींचा घरचा आहेर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहमदनगर मध्ये पत्रकारांना चहा पाजण्यासाठी धाब्यावर न्या, बाकी सुजय विखे बघून घेतील, असं आपल्या पदाधिकाऱ्यांना बजावलं होतं. बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा प्रदेशाध्यक्षांना घरचा आहेर असल्याचे चर्चा रंगली आहे.

आमदार, खासदार नेत्यांचे टोचले कान : स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या गडकरी यांनी आमदार खासदार व नेत्यांना उद्देशून केलेलं वक्तव्य जोरदार चर्चेत आला आहे आमदार, खासदार आणि नेत्यांनी ठेकेदारांना त्रास देऊ नये. माझी या सर्वांना विनंती आहे. थोडं सहकार्य करा. दबाव आणून ठेकेदारांना त्रास देऊ नका. रस्त्यांच्या कामासाठी माझ्याकडे आणि एनएचएआयकडे पैशाची कमतरता नाही. अशा शब्दात कान टोचत मी एका ठेकेदाराला सांगितलं होतं की रस्त्याला तडा गेला तर तुला बुलडोझरखाली फेकेल असा किस्साही सांगितला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 696
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.