महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई – शिंदे-फडणवीस-पवार सरकारने राज्यातील पालकमंत्रीपदामध्ये मोठे फेरबदल केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुधारित बारा जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी बुधवारी (ता. 4 ऑक्टोंबर) जाहीर केली.
नव्याने जाहीर करण्यात आलेल्या पालकमंत्री पदामध्ये चंद्रकांत पाटील यांना पुण्याच्या पालकमंत्री पदावरून हटविण्यात आले असून त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर उपमुख्यमंत्री पद मिळाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही होते. याच पार्श्वभूमीवर ते मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत असतानाच मुख्यमंत्र्यांनी पवारांवर पुण्याची जबाबदारी सोपविली आहे.
नव्याने जाहीर करण्यात आलेले पालकमंत्री पुढील प्रमाणे, (कंसात सोपविलेला जिल्हा)
उपमुख्यमंत्री अजित पवार (पुणे)
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (अकोला)
चंद्रकांत पाटील (सोलापूर व अमरावती)
विजयकुमार गावित (भंडारा)
हसन मुश्रीफ (कोल्हापूर)
धर्मराव बाबा आत्राम (गोंदिया)
धनंजय मुंडे (बीड)
संजय बनसोडे (परभणी)
अनिल पाटील (नंदुरबार)
सुधीर मुनगंटीवार (वर्धा)



