Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात शिवसेनेचा (ठाकरे) उपक्रम… “होऊ द्या चर्चा”, केंद्र व राज्य सरकारच्या बोलघेवड्या योजनांचा केला भांडाफोड
राजकारण

संगमनेरात शिवसेनेचा (ठाकरे) उपक्रम… “होऊ द्या चर्चा”, केंद्र व राज्य सरकारच्या बोलघेवड्या योजनांचा केला भांडाफोड

संगमनेर प्रतिसाद...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज 

संगमनेर – भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणारी खोटी आश्वासने, भुलथापा आणि फसव्या योजनांचा भांडाफोड संगमनेर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गेल्या तीन दिवसात संगमनेरकर नागरिकांमध्ये जाऊन केला आहे. या योजनांचा भांडाफोड करताना शिवसेनेने एक प्रकारे “होऊ द्या चर्चे”च्या माध्यमातून संगमनेरकरांना बोलते करण्याचा प्रयत्न केला.

केंद्र व राज्य सरकार विरोधात शिवसेनेकडून राज्यभर “होऊ द्या चर्चा” हा उपक्रम राबविला जात आहे. १ ते ३ ऑक्टोंबर दरम्यान संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने शहरातील १४ प्रभागांमध्ये गल्लो-गल्ली, चौका-चौकात शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

तीन दिवस सुरू असलेल्या या उपक्रमात शिवसेनेच्या पदाधिकारी, शिवसैनिकांसह संगमनेरकर बोलते झाले होते. केंद्र व राज्य सरकार विरोधातील असंतोष यावेळी व्यक्त करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळा पैसा भारतात परत आणण्याच्या तसेच प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये देण्याच्या योजनेचा, सरकारी शाळांचे खाजगी कंत्राटीकरण, शासन आपल्या दारी, महागाई, इंधनाच्या वाढत्या किमती, २०२२ पर्यंत प्रत्येकाला पक्के घर, मुंबईच्या अरबी समुद्रात शिवस्मारक बांधणे, कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमला पाकिस्तानातून फरफटत आणणे, महिलांच्या सुरक्षा, शिक्षण, रस्ते, पाणी, बेरोजगारी, युवकांना नोकऱ्या, गॅस सिलेंडर सबसिडी, शेतीमालाला हमीभाव, पिक विमा आदी फसव्या बोलघेवड्या योजनांचा पर्दाफाश या उपक्रमातून करण्यात आला.

तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, उपतालुका प्रमुख निलेश गुंजाळ, शरद कवडे, सदाशिव हासे, विजय सातपुते, विकास डमाळे, इम्तियाज शेख, वेणूगोपाल लाहोटी, दीपक वन्नम, सुदर्शन इटप, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, गोविंद नागरे, अमोल डुकरे, आसिफ तांबोळी, फैसल सय्यद, सचिन साळवे, दीपक साळुंखे, नितीन अनाप, माधव फुलमाळी, परवेज शेख, संकेत खुळे, प्रवीण चव्हाण, जितेंद्र दर्वे, एस. पी. राहणे, लिंगमूर्ती चिंता, गणेश पर्बत, सचिन पावबाके, वैभव अभंग, नाना बाप्ते, अशोक बडे, सचिन जाधव, प्रसन्न गोरे, मनोहर जाधव, ओंकार राऊत, मुकेश काटे, प्रकाश चोथवे, जयदेव यादव, अनिल खुळे, अक्षय बिल्लाडे, अनुप म्हाळस आदींसह संगमनेरकर सहभागी झाले होते. यातील बहुतेकांनी भाषणाद्वारे सरकारच्या योजनांचा पर्दाफाश केला.

शिवसेना उपनेते बबन घोलप, लोकसभा संपर्कप्रमुख सुनील शिंदे, विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे, उत्तर नगर जिल्हा प्रमुख मुजीब शेख यांच्या सहकार्यातून संगमनेरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारच्या फसव्या योजनांचा भांडाफोड करण्यात आला. जाहिरातपिपासू व फेकू सरकारचा निषेध या माध्यमातून आम्ही अनोख्या पद्धतीने केला. या माध्यमातून जनतेच्या मनातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले गेले. संगमनेरकरांचा मोठा प्रतिसाद यावेळी दिसून आला. – अमर कतारी शिवसेना संगमनेर शहर प्रमुख.

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,022
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.