Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नासिक-पुणे मार्गावरील पथदिवे सुरू न झाल्यास भाजपचा पुन्हा आंदोलनाचा इशारा
राजकारण

नासिक-पुणे मार्गावरील पथदिवे सुरू न झाल्यास भाजपचा पुन्हा आंदोलनाचा इशारा

प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांना दिले निवेदन
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 9, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज @ संगमनेर

पुणे-नाशिक महामार्गावरील बंद पडलेले पथदिवे तातडीने सुरु करावेत, पथदिवे सुरु करण्यात अडचणी असतील तर या संपूर्ण कामाची चौकशी करुन संबंधित ठेकेदार कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्यावतीने प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पथदिवे लवकर सुरु न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

आठ दिवसांपूर्वी पुणे-नाशिक महामार्गावरील पथदिव्यांचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र उद्घाटन झाल्यानंतर एकही दिवस हे पथदिवे सुरु झालेले नाहीत. ही बाब भाजपाच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. या महामार्गाच्या सुशोभिकरणासाठी केंद्र सरकारने निधीची उपलब्धतता करुन दिली आहे. पथदिव्यांचे कामही पूर्ण झाल्यामुळे याचे उद्घाटनही करण्यात आले. परंतू उद्घाटन झाल्यानंतर पथदिवे सुरुच होत नसल्याने नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

उद्घाटनाच्या दिवशीच या पथदिव्यांच्या जोडणीमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आले होते. पथदिव्यांचे काम अपूर्ण आहे हे माहिती असूनही संबंधित ठेकेदाराने उद्घाटनाची केलेली घाई तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाच्या अभियंत्यांनाही याबाबत अंधारात ठेवून झालेले निर्णय आणि काम पूर्ण झाल्याचे कोणतेही दाखले प्रशासक अधिकाऱ्यांकडे नसल्याने या संपूर्ण पथदिव्याच्या कामांतील गोंधळाची चर्चा आता सुरु झाली आहे.

यासर्व पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांची भेट घेवून सर्व वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे. पथदिवे लावूनही सुरु होत नसल्यामुळे “असून अडचण नसून खोळंबा” अशी परिस्थिती या मार्गाची झाली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने तसेच नागरीकांची वर्दळही मोठ्या संख्येने असल्याने हे पथदिवे सुरु होणे अत्यंत गरजेचे असल्याची बाब शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

पथदिवे लवकर सुरु न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आला आहे. याप्रसंगी अमोल खताळ, दादासाहेब गुंजाळ, शशिकांत मतकर, शैलेश फटांगरे, रऊफ शेख, रोहिदास साबळे, लहानू नवले, विकास गुळवे, अनिल निळे, बबलू काझी, संतोष हांडे, बाळासाहेब गोसावी, संजय वाकचौरे, लहानू चाबुकस्वार, प्रमोद ढवळे, जितेंद्र कापकर, आनंद मोकळ, भूषण भोकनळ, मोहन मुर्तडक, कैलास बिबवे, दशरथ कासार, सद्दाम चौगुले, नवनाथ भोकनळ, सुभाष कासार, ज्ञानेश्वर मुर्तडक, भास्कर कासार, भाऊसाहेब मतकर, अकबर शेख, घनश्याम भारस्कर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 773
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

By अनंत पांगारकरJune 4, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या घुलेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि…

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.