Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माझ्या कारखान्यावर रेड झाली तेव्हा तुम्ही दोन दिवसांत 11 कोटी जमा केले; पण आज माझ्याकडे तुम्हाला बसण्यासाठी अंथरायला सतरंजीसुद्धा… माजी मंत्री पंकजा मुंडे
राजकारण

माझ्या कारखान्यावर रेड झाली तेव्हा तुम्ही दोन दिवसांत 11 कोटी जमा केले; पण आज माझ्याकडे तुम्हाला बसण्यासाठी अंथरायला सतरंजीसुद्धा… माजी मंत्री पंकजा मुंडे

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

माझा माणूस उन्हात असताना मी सत्तेच्या सावलीत कशी राहू शकते ?

महाराष्ट्र संवाद न्यूज

भगवान भक्ती गड (बीड) : माझ्या कारखान्यावर रेड झाली तेव्हा तुम्ही दोन दिवसांत 11 कोटी जमा केले. पण आज माझ्याकडे तुम्हाला बसण्यासाठी अंथरायला सतरंजीसुद्धा नाही. तुम्ही उन्हात म्हणून मी पण उन्हात आहे. माझा माणूस उन्हात असताना मी सत्तेच्या सावलीत कशी राहू शकते असे म्हणत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कारखान्यावर झालेल्या कारवाईबाबत खुलासा केला.

सावरगाव येथील भगवान बाबा भक्ती गडावर पोहचल्यावर पंकजा मुंडे भगवान बाबांचे दर्शन, आरती, कन्या पूजन करून व्यासपीठावर आल्या. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे या तिघी बहिणी यावेळी एकत्र होत्या.

काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर झालेल्या कारवाईनंतर आज दसरा मेळाव्यात त्या काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी त्यांनी भगवान भक्ती गडावर बोलताना या देशातील शेतकरी सुखी आहे का असा सवाल सरकारला विचारत भाजपला घरचा आहेर दिला.

यावेळी मुंडे यांनी उपस्थितांना संबोधीत करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, कसं वाटतेय, कुठून कुठून आलाय तुम्ही, विदर्भातून कोण- कोण आलय, यासोबतच त्यांनी राज्यातील प्रत्येक विभागातून आलेल्यांचा आढावा घेतला.

तुम्ही सर्वजण प्रत्येक विभागातून जिल्ह्यातून तुम्ही आले आहात. माझ्यासाठी, स्व. गोपीनाथ मुंडेंसाठी आणि भगवान बाबांसाठी तुम्ही आला आहात असे म्हणत त्या उपस्थितांपुढे नतमस्तक झाल्या.

जेव्हा मी महाराष्ट्रभर शिवशक्ती परिक्रमा केली. तेव्हा मला वाटलं नव्हतं एवढं प्रेम मिळेल. पण मला त्या दिव्यतेंतून भव्यता दिसून आली. मुंडे साहेब एक वाक्य नेहमी म्हणाये की, मी माझ्या कातड्याचे जोडे जरी केले तरी या माणसांचे उपकार फेडू शकणार नाही.

मुंडे यांच्या भाषणावेळी मुंडें समर्थकांनी काहीकाळ गोंधळ घातला. त्यामुळे भाषण काहीकाळ थांबविण्यात आले होते. एवढेच नव्हे तर गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना मी राजकारण करावे का की सोडून द्यावे असा प्रश्न विचारत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

येथे धनगरांसह सगळेच समाजाचे लोक आले आहेत. शेतकरी सुखी आहे का सांगा मला, देशात सगळे आलबेल आहे का मला सांगा, शेतकरी आनंदात आहेत का, विमा मिळाला का, अनुदान मिळाले का, तुम्हाला शेतात काम नाही आणि द्यायला दाम नाही. ऊसतोड कामगारांचे प्रश्न जैसे थे आहेत. तेव्हा आता पैसा वाढवून दिले पाहीजे नाही तर हा ऊसतोड मजूर ऊस तोडायला जाणार नाही असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 647
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.