Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » हे तर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीचे प्रभावी यश : महसूल मंत्री विखे पाटील
राजकारण

हे तर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीचे प्रभावी यश : महसूल मंत्री विखे पाटील

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/11/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

लोणी : ग्रामपंचायत निवडणूकीत मिळालेला विजय म्‍हणजे महायुती सरकारच्‍या कामावर मतदारांनी केलेले शिक्‍कामोर्तब असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली सुरु असलेल्‍या विविध योजनांच्‍या अंमलबजावणीचे मिळालेले हे प्रभावी यश आहे. सरकार आणि संघटना यांच्‍यातील समन्‍वयाने सुरु असलेल्‍या विकासात्‍मक कामाला मतदारांनी साथ दिली असल्‍याची प्रतिक्रीया महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.

मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली राहाता तालुक्‍यातील ९ ग्रामपंचायतींमध्‍ये जनसेवा मंडळाचे उमेदवार विजयी झाले आहेत. संगमनेर तालुक्‍यातील दोन ग्रामपंचायतींमध्‍ये आणि श्रीरामपूर तालुक्‍यातील ७ ग्रामपंचायतींमध्‍ये विजयी झालेल्‍या उमेदवारांचे अभिनंदन करुन, मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, आमचे नेते आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली भारतीय जनता पक्षाच्‍या माध्‍यमातून ग्रामीण भागात केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या योजनांचा लाभ ‘शासन आपल्‍या दारी’ या उपक्रमातून पोहोचविण्‍याचे काम निरंतरपणे सुरु आहे. समाजातील सर्व घटकांशी या उपक्रमातून होत असलेला सुसंवाद याचे यश या निवडणूकीत दिसून आले आहे.

राज्‍यात मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍या नेतृत्‍वाखाली महायुतीचे सरकार आल्‍यानंतर ग्रामीण भागाच्‍या विकासाला मोठी गती मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या महत्‍वकांक्षी जलजीवन मिशन योजनेचे काम गावागावात सुरु झाले. केंद्र सरकारच्‍या माध्‍यमातून सुरु असलेल्‍या योजनांचा लाभही थेट लाभार्थ्‍यांना मिळत असल्‍याचा परिणाम या निवडणूकीत पाहायला मिळाला. तसेच राज्‍य सरकारच्‍या माध्‍यमातूनही ग्रामीण भागाच्‍या विकासाला निधी उपलब्‍ध होत आहे. ग्रामपंचायत निवडणूकी मिळालेले यश म्‍हणजे सरकारच्‍या कामावर एक प्रकारे मतदारांनी विश्‍वास व्‍यक्‍त केला.

विविध योजनांचा पाठपुरावा कार्यकर्त्‍यांच्‍या, भारतीय जनता पक्षाच्‍या माध्‍यमातून होत असतो. सरकार आणि संघटना यांच्‍यातील समन्‍वयाचा योग्‍य परिणाम या निवडणूकीच्‍या माध्‍यमातून स्‍पष्‍ट झाला असून, राहाता तालुक्‍यातील विकासाला कधीही निधी कमी पडू दिला नाही. राज्‍य सरकारच्‍या माध्‍यमातून शिर्डी मतदार संघाच्‍या विकासाला उपलब्‍ध होत असलेल्‍या निधीबद्दल त्‍यांनी मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्र्यांचे आभार मानून विकासाची प्रक्रीया आणि शासन योजनांची अंमलबजावणी यशस्‍वीपणे होत असल्‍यामुळेच सर्व योजनांचे लाभार्थी हे शिर्डी मतदार संघात सर्वाधिक असल्‍याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 890
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.