महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर शिवसेनेच्यावतीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शुक्रवारी दिवंगत शिवसेनाप्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
शुक्रवारी सकाळी दहा वाजता संगमनेर बस स्थानकाच्यासमोर ठाकरे यांच्या पवित्र स्मृतींचा जागर करत त्यांच्या प्रतिमेस शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी अभिवादन केले. यावेळी दिवंगत ठाकरे यांच्या आठवणींना पदाधिकाऱ्यांनी उजाळा दिला.
अभिवादन कार्यक्रमावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, दिव्यांग सहाय्यसेना जिल्हाप्रमुख जालिंदर लहामगे, ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुख योगेश बिचकर, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, शिव आरोग्य सेनेचे शिर्डी लोकसभा प्रमुख अजीज मोमीन (मुस्लिम मावळा), माजी शहर प्रमुख प्रसाद पवार, माजी पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, युवा सेना शहर प्रमुख गोविंद नागरे, विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, शिवसेना विधानसभा प्रमुख रंगनाथ फटांगरे, उपशहर प्रमुख इम्तियाज शेख, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख आशा केदारी शहर प्रमुख संगीता गायकवाड आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या परिसर शिवसेनामय झाला होता. उपस्थितांनी ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण केली. यावेळी वेणूगोपाल लाहोटी, दीपक साळुंखे, कचरू पाटील वारुंगसे, अनुप म्हाळस, अक्षय बिल्लाडे, गोट्या जाधव, शरद कवडे, पप्पू कानकाटे, त्रिलोक कतारी आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार बाळासाहेब थोरात यांनीही केलं अभिवादन…
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! pic.twitter.com/cF4cx1XRRD
— Balasaheb Thorat (@bb_thorat) November 17, 2023






