Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि नामदेव जाधव यांचे शहीद स्मारक बस स्थानकाच्या परिसरातच; लवकरच जागा नगरपरिषदेकडे वर्ग होणार : माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे
राजकारण

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि नामदेव जाधव यांचे शहीद स्मारक बस स्थानकाच्या परिसरातच; लवकरच जागा नगरपरिषदेकडे वर्ग होणार : माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे

आमदार सत्यजित तांबे यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/11/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बस स्थानक परिसरातच व्हावा, यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा व भव्य दिव्य शहीद स्मारक बस स्थानक परिसरात करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्व तालुक्यांमध्ये शिवस्मारक बांधण्यासंदर्भातील घोषणा करण्यात आली आहे. याचे स्वागत करत तांबे यांनी म्हटले आहे की, संगमनेरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीने एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे अश्वारूढ पुतळा बस स्थानक परिसरात व्हावा, यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर बस स्थानक परिसरातील जागेचे हस्तांतर अंतिम टप्प्यात आले आहे. या स्मारकासाठी आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे.

अश्वारूढ पुतळा आणि शहीद स्मारकासाठी एक कोटी रुपयांचा निधी पुरेसा नसून त्यासाठी किमान दोन कोटी रुपयांचा निधी मिळाल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह बस स्थानक परिसरात व्हीक्टोरिया क्रॉस विजेते नामदेवराव जाधव यांचे शहीद स्मारक करता येईल. हे स्मारक तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांनी देशाच्या संरक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी आपली प्राणाची आहुती दिली अशांच्या स्मरणार्थ नामदेव जाधव यांच्या शहीद स्मारकाचा प्रस्ताव देखील नगरपालिकेचा आहे ही दोन्ही कामे वाढीव निधीतून पूर्ण होऊ शकतात. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे.

यासंदर्भात राज्य सरकार व जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. संगमनेर मध्ये बस स्थानक परिसरात हा अश्वारूढ पुतळा व्हावा यासाठी संगमनेर नगर परिषदेने 3 जून 2019 रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव देखील केला असल्याचे सांगत या स्मारकाबाबत आमदार बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सातत्याने पाठपुरावा केला.

सरकार बदलल्यानंतर देखील आमदार सत्यजित तांबे यांनी यासाठीचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यासाठी त्यांनी 21 ऑगस्ट 2023 रोजी पुतळ्यासाठी सदरची बस स्थानकातील जागा नगर परिषदेकडे हस्तांतरित करावी. अशी मागणी देखील केली आहे या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत एसटी महामंडळाला तसा प्रस्ताव सादर करण्याची निर्देश केले आहे तो प्रस्ताव देखील आता अंतिम टप्प्यात असल्याने पुतळ्यासाठीची जागा लवकरच नगर परिषदेकडे वर्ग होईल. असे दुर्गाताई तांबे यांनी म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,079
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
क्रिडा व कला

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar मुंबई/अहिल्यानगर: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (मध्यवर्ती), मुंबई यांच्या वतीने ‘अखिल भारतीय मराठी…

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.