महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई : आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह काही नेत्यांनी १६ नोव्हेंबर रोजी लोअर परळ येथील डेलिसल ब्रिजचं उद्घाटन केलं आहे. कोणत्याही परवानगीशिवाय हा पूल प्रवाशांसाठी खुला केल्याने आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे नेते सुनील शिंदे व सचिन अहिर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने एनएम जोशी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आदित्य ठाकरेंसह सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
‘एएनआय’ वृत्तसंस्थेनं या संदर्भातील वृत्त दिले आहे. आदित्य ठाकरे, सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्याविरुद्ध एन. एम. जोशी पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम १४३, १४९, ३२६ आणि ४४७ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.

या पुलाचे काम आधी रखडवले होते. आमच्या मागणीनंतर ते पूर्ण झाले. यास आता अनेक दिवस झाले आहेत. आता कुणासाठी या पुलाचे उद्घाटन थांबवले आहे. पालकमंत्र्यांना वेळ नाही म्हणून लोकांची कोंडी करणार का? त्यामुळे लोकांसाठी उद्घाटन केलं, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
A case has been registered at NM Joshi Police Station against Uddhav Thackeray faction leader Aditya Thackeray, Sunil Shinde, and Sachin Ahir. The case has been registered under sections 143, 149, 326 and 447 of IPC: Mumbai police
More details awaited.
— ANI (@ANI) November 18, 2023

