Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगा पतसंस्था, नगर अर्बन बँकेसह अन्य आर्थिक गुन्ह्यांचा तपास आता या पोलीस उपाधीक्षकांकडे…
गुन्हेगारी

दूधगंगा पतसंस्था, नगर अर्बन बँकेसह अन्य आर्थिक गुन्ह्यांचा तपास आता या पोलीस उपाधीक्षकांकडे…

दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरणातील आरोपींचे धाबे दणाणले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/02/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहमदनगर : राज्याच्या गृह विभागाने पोलीस दलात केलेल्या मोठ्या फेरबदलानंतर अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेला नवे डीवायएसपी मिळाले होते. मात्र या बदल्यांच्या आदेशात पुन्हा नव्याने फेरबदल करण्यात आले असून आता नगर जिल्ह्यातून नाशिकला बदलून गेलेले पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना पुन्हा जिल्ह्यात पाठविण्यात आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संगमनेरमधील बहुचर्चित दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील चेअरमन भाऊसाहेब कुटे आणि त्याच्या नातेवाईकांनी केलेल्या अपहार प्रकरणाचा, जिल्ह्यातील बहुचर्चित नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहार प्रकरण यासह अन्य आर्थिक गुन्ह्यांचा तपास नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे. गेल्या अनेक दिवसात या तपासात कोणतीही प्रगती झाली नाही.

न्यायालयाने दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरणातील आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज नाकारल्यानंतर देखील आरोपींपर्यंत आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी पोहोचू शकले नव्हते. पोलीस या गुन्हेगारांना अटक करत नसल्याने तसेच या दोन्ही आर्थिक संस्थांमधील ठेवीदारांच्या ठेवी पुन्हा परत मिळत नसल्याने या बड्या प्रतिष्ठित राजकीय गुन्हेगारांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अभय मिळत असल्याची चर्चा सुरू होती. दूधगंगा पतसंस्था, नगर अर्बन बँक आधी गुन्ह्यांमध्ये राजकीय प्रतिष्ठितांचा समावेश असल्याने तपास अधिकारी राजकीय दबावाखाली असल्याचे देखील चर्चा होती.

नव्याने आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आलेले पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यापूर्वी शिर्डी उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक होते. गृह विभागाने काढलेल्या आदेशात मिटके यांची बदली शिर्डी येथून नाशिकमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्तपदी करण्यात आली होती. त्यांच्या जागेवर नव्याने पोलीस प्रशिक्षण पूर्ण झालेले उपाधीक्षक शिरीष वमने यांची नियुक्ती झाली. याशिवाय आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपाधीक्षक कमलाकर जाधव यांची देखील नाशिकला बदली झाली. त्यामुळे गृह शाखेचे पोलीस उपाधीक्षक हरीश खेडकर यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.

गृह विभागाने काढलेल्या आदेशात आर्थिक गुन्हे शाखेत सोलापूर येथून संजय वांबळे यांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र काही तासातच सोमवारी रात्री या आदेशात पुन्हा फेरबदल करण्यात आले असून नाशिकला बदलून गेलेले मिटके यांना पुन्हा नगरमध्ये बोलाविण्यात आले असून त्यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेचा पदभार सोपविण्यात आला.

आर्थिक गुन्हे शाखेला नवे डीवायएसपी मिळाल्याने आता संदीप मिटके यांच्यासमोर संगमनेरमधील बहुचर्चित दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरण, नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणासह अन्य बड्या आर्थिक गुन्ह्यांच्या तपासाचे आव्हान असेल. मिटके यांची शिर्डीतील कामगिरी लक्षात घेता आर्थिक गुन्हे शाखेतदेखील ते मोठी कामगिरी करतील, अशी अपेक्षा असल्याने दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरणातील आरोपींचे धाबे दणाणले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,495
गुन्हेगारी दूधगंगा पतसंस्था भाऊसाहेब कुटे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

By Annant Ppangarkar06/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र…

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.