Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी वाघ, काळ संघर्षाचा पण भविष्य काँग्रेसचेच: आमदार बाळासाहेब थोरात
राजकारण

जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी वाघ, काळ संघर्षाचा पण भविष्य काँग्रेसचेच: आमदार बाळासाहेब थोरात

कठीण काळामध्ये एकत्रितपणे जिल्ह्यात काम करू
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/02/2024Updated:09/02/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपदी जयंत रामनाथ वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते वाघ यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. वाघ यांना शुभेच्छा देताना थोरात म्हणाले, ‘काळ संघर्षाचा आहे मात्र भविष्य काँग्रेस पक्षाचे आहे, त्यामुळे झोकून देऊन काम करा. आपण जिल्ह्यात काँग्रेस बळकटीने उभी करू.‘

काँग्रेसच्या अध्यक्षपदी वाघ यांच्या नियुक्तीचा आदेश प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या सहीने निर्गमित करण्यात आला. वाघ हे नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे विश्वस्त आहेत. यशवंतराव चव्हाण व्यासपीठचे उपाध्यक्ष, कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष असून विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांवर ते सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

वाघ यांचे वडील रामनाथ वाघ हे जिल्हा परिषदेचे सर्वात लोकप्रिय अध्यक्ष तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीचे सात वर्षे अध्यक्ष राहिलेले आहेत. महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या विचारांवर श्रद्धा असलेले वाघ कुटुंबीय आहे.

आमदार थोरात म्हणाले, वाघ यांना मोठी पुरोगामी आणि वैचारिक परंपरा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काँग्रेस सक्षमपणे काम करेल, असा मला विश्वास आहे. वाघ यांनी आजवर कायम कामाला प्राधान्य दिले. कोणत्याही पदाच्या अपेक्षेत ते अडकले नाही किंवा कधी कोणत्या पदासाठी त्यांनी आग्रह धरला नाही.

आज या संघर्षाच्या काळात त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असेल, असाही विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण काळे म्हणाले, या कठीण काळामध्ये मी आणि वाघ एकत्रितपणे जिल्ह्यात काम करू. एकजुटीने पक्षाचा विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करू.

यावेळी अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण काळे, ज्ञानदेव वाफारे, प्रताप शेळके, संपतराव म्हस्के, सोमेश्वर दिवटे, हिरालाल पगडाल, रामहरी कातोरे आदीसह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 801
आमदार बाळासाहेब थोरात जयंत वाघ निवड
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

By Annant Ppangarkar05/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- गणेशोत्सवाच्या तोंडावर वर्गणीच्या मुद्द्यावरून वादाची ठिणगी पडल्याचे समोर आले आहे. पुढच्या…

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.