Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » व्याजापेक्षा चौपट पैशांची वसुली तरीही तगादा करणाऱ्या दोघा सावकाराला कंटाळून मागितली स्वेच्छा मरणाची परवानगी, सहकार खात्याची छापेमारी
गुन्हेगारी

व्याजापेक्षा चौपट पैशांची वसुली तरीही तगादा करणाऱ्या दोघा सावकाराला कंटाळून मागितली स्वेच्छा मरणाची परवानगी, सहकार खात्याची छापेमारी

सावकारांवरील कारवाईकडे लक्ष
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/02/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – सहकार विभागाच्या छापेमारीत संगमनेर तालुक्यातील साकुर येथील दोन सावकारांवर कारवाई करण्यात आली आहे. या छाप्यात सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती काही महत्त्वाचे दस्त लागल्याचे बोलले जाते. सावकाराच्या सततच्या तगाद्याला कंटाळून साकुरमधील एका दाम्पत्याने जिल्हाधिकाऱ्याकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली होती. त्यानंतर तातडीने वरिष्ठ पातळीवर हालचाली झाल्या आणि ही कारवाई झाली.

सहकार खात्याचे उपनिबंधक संतोष कोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन पथकांनी राहुल किसन डोंगरे व सचिन बन्सी डोंगरे (रा. साकुर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांच्या दोघा सावकारांविरोधात सावकारी अधिनियमान्वये कारवाई करण्यात आले आहे.

यासंदर्भात साकुर येथीलच संगीता व विलास दौलत वाकचौरे या दाम्पत्याने सावकाराच्या जाचातून मुक्ती मिळण्यासाठी बुधवारी (१४ फेब्रुवारी) जिल्हाधिकारी यांना स्वेच्छा मरणाची परवानगी मिळावी, अशी निवेदनाद्वारे मागणी केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांना अनधिकृत सावकारी करणाऱ्या सावकारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

या आदेशानुसार शुक्रवारी ही छापेमारी करण्यात आली. तक्रारदार दांपत्याने साकूर येथील सावकार राहुल किसन डोंगरे व सचिन बन्सी डोंगरे यांच्याकडून व्यवसायासाठी व्याजाने कर्ज घेतले. ठरलेल्या रकमेच्या व्याजापेक्षा चारपट पैसे संबंधित सावकारांनी वसूल केले, तरीही ते आणखी पैशाची मागणी करत होते. ते आमचे घर बळकावण्यासाठी वेठीस धरत असल्याने माझ्या कुटुंबला स्वेच्छा मरणाची परवानगी द्या, अन्यथा आम्ही जीवन संपवून टाकू, असा इशारा विलास दौलत वाकचौरे व संगीता विलास चाकचौरे यांनी निवेदनातून दिला होता.

दरम्यान, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी या घटनेची गंभीर दखल घेत, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांना संबंधित बेकायदेशीर सावकारांवर कारवाईचे आदेश दिले.

त्यानंतर सहकार उपनिबंधक संतोष कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार अधिकारी राजेंद्र वाकचौरे व अल्ताफ शेख यांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र पथके नेमण्यात आली होती. यात ज्ञानेश्वर गोरे, सहायक सहकार अधिकारी प्रदीप वीरनारायण, बी. एन. चतुरे यांचा समावेश होता. या पथकांनी सावकार डोंगरे यांचे घर व दुकानावर पोलिस बंदोबस्तात कारवाई केली. कारवाईत महत्वाचे दस्त जप्त करण्यात आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 924
उपनिबंधक छापेमारी बेकायदेशीर सावकारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.