Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शनिवारी देवगडला (संगमनेर) भरणार भव्य अश्व प्रदर्शन आणि अश्व बाजार, सारंगखेडा पाठोपाठ राज्यातील सर्वात मोठा अश्व बाजार : रणजीतसिंह देशमुख
सामाजिक

शनिवारी देवगडला (संगमनेर) भरणार भव्य अश्व प्रदर्शन आणि अश्व बाजार, सारंगखेडा पाठोपाठ राज्यातील सर्वात मोठा अश्व बाजार : रणजीतसिंह देशमुख

७ वर्षांपासून सुरू आहे उपक्रम
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/02/2024Updated:22/02/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे श्रीक्षेत्र देवगड यात्रे निमित्ताने शनिवारी (ता. २४ फेब्रुवारी) सारंगखेडा नंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा अश्व बाजार, अश्व प्रदर्शन व अश्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती अश्वप्रेमी असोसिएशनचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी दिली.

देशमुख म्हणाले, सारंगखेडापाठोपाठ संगमनेरमध्ये होत असलेले हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे अश्वप्रदर्शन आणि अश्व बाजार आहे. प्रदर्शनाचे हे सातवे वर्ष असून या कार्यक्रमासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात, कर्नाटक राज्याचे माजी मंत्री आमदार विनय कुलकर्णी, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, जयहिंदचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, इंद्रजीत थोरात, हिवरगाव पावसाचे सरपंच सुभाष गडाख, देवगड देवस्थानचे अध्यक्ष उत्तम जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

जगभर अश्वाच्या विविध प्रजाती आणि त्यांचे विविध गुणधर्म आहेत. अगदी शिवकालापासून अश्वांना विशेष महत्त्व आहे. संगमनेरमध्ये दरवर्षी भव्य अश्वप्रदर्शन भरवले जात असून यामध्ये विविध राज्यांमधील अनेक अश्वपालक आपले जातिवंत अश्व घेऊन सहभागी होतात. यावर्षीही भारतासह विविध देशातून अनेक जातीवंत अश्व सहभागी होणार आहेत. याचबरोबर अश्वांचे नृत्य आणि अश्वांच्या विविध स्पर्धाही होणार आहे. यावर्षीचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच घोडा बिग जस्पर हाही यात सहभागी होणार आहे.

या अश्व स्पर्धा व अश्व बाजारसाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, उत्तमराव जाधव, रफिक फिटर, मकरंद मुळे, यांच्यासह शिवराज्य निर्माण संघटना व संगमनेर तालुका अश्वप्रेमी असोसिएशनच्या सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 454
अश्व प्रदर्शन अश्व बाजार रणजीतसिंह देशमुख
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

By Annant Ppangarkar05/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- गणेशोत्सवाच्या तोंडावर वर्गणीच्या मुद्द्यावरून वादाची ठिणगी पडल्याचे समोर आले आहे. पुढच्या…

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.