Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तपास सुरू होण्यापूर्वीच ‘या’ अधिकाऱ्याची झालेली बदली दूधगंगा पतसंस्थेच्या अपहार प्रकरणातील आरोपींच्या पथ्यावर!
गुन्हेगारी

तपास सुरू होण्यापूर्वीच ‘या’ अधिकाऱ्याची झालेली बदली दूधगंगा पतसंस्थेच्या अपहार प्रकरणातील आरोपींच्या पथ्यावर!

तपासात प्रगती होत नसल्याने तपास अधिकाऱ्यांवर राजकीय दबावाची चर्चा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/02/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहमदनगर, दि. २९
गुन्हा दाखल होऊन तब्बल सहा महिन्यांचा कालावधी उलटून देखील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील सुमारे ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या रडारवर येत नसल्याने ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच काही दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेत वर्णी लागलेल्या पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्याकडून ठेवीदारांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र त्यांनी तपास सुरू करण्यापूर्वीच बुधवारी त्यांची नाशिकला सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बदली झाल्याने ठेवीदारांच्या अपेक्षा मावळल्या आहे.
पोलीस उपाधीक्षक असलेल्या मिटके यांची बदली काही दिवसांपूर्वी नाशिकला सहाय्यक पोलीस आयुक्तपदी झाली होती. मात्र तेथे हजर होण्यापूर्वीच त्यांच्या बदली आदेशात पुन्हा बदल करत त्यांच्याकडे अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधीक्षकपदाचा पदभार सोपविण्यात आला होता. पदभार घेताच मिटके यांनी नगरच्या बहुचर्चित नगर अर्बन बँकेतील तपासात लक्ष घातले. यातील काही आरोपींना त्यांनी अटक केल्याने या तपासाला वेग आला होता.नगर अर्बन बँकेप्रमाणेच संगमनेरच्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने आणि यात राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठित आरोपी पतसंस्थेचा अध्यक्ष भाऊसाहेब कुटे, त्याचे कुटुंबीय आणि अन्य बहुतांशी आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयात नामंजूर झाल्यानंतर देखील तपास अधिकाऱ्यांचे हात या व्हाईट कॉलर क्रिमिनल्सच्या कॉलरपर्यंत पोहोचलेले नव्हते, मिटके यांच्याकडून नगर अर्बन बँकेच्या तपासातील झालेली प्रगती बघता दूधगंगा पतसंस्थेच्या या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात देखील मिटके यांच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या.
दूधगंगेचा तपास मिटके यांच्याकडे गेल्याने या गुन्ह्यातील फरार आरोपींचे धाबे दणाणले होते. कोणत्याही क्षणी आरोपींच्या अटकेची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे कोट्यावधी रुपयांच्या ठेवी अडकलेल्या ठेवीदारांच्या आशा उंचावल्या होत्या. तपास अधिकारी असलेल्या मिटके यांनी देखील ठेवीदारांना आरोपींना लवकरच अटक करण्याचा शब्द दिला होता.
त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासाला वेग येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र मिटके यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यापूर्वीच त्यांची आर्थिक गुन्हे शाखेतून नाशिकच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी राज्य शासनाचा गृह विभागाकडून त्यांच्यासह राज्यातील २० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहे.
असे असले तरी नगरच्या त्यांच्या रिक्त जागेवर आर्थिक गुन्हे शाखेत अद्याप दुसऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे मिटके यांची बदली या नगर अर्बनसह दुधगंगा पतसंस्थेच्या गुन्ह्यातील आरोपींच्या पथ्यावर पडली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,684
दूधगंगा पतसंस्था पोलीस भाऊसाहेब कुटे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.