Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची पहिली यादी जाहीर, विखेंविरोधात डाव टाकला… अहमदनगरमधून निलेश लंके फायनल; अन्य उमेदवारात या चौघांचा समावेश
राजकारण

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची पहिली यादी जाहीर, विखेंविरोधात डाव टाकला… अहमदनगरमधून निलेश लंके फायनल; अन्य उमेदवारात या चौघांचा समावेश

अडचणीत सापडलेल्या खासदार विखे यांच्या समोरील डोकेदुखी आणखी वाढली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/03/2024Updated:30/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार दि. ३० मार्च

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने शनिवारी लोकसभेसाठीची आपली पहिली यादी जाहीर केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या नगर दक्षिणमधून शुक्रवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेल्या निलेश लंके या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शिलेदाराला शरद पवारांनी संधी दिली आहे. राज्यातील महत्त्वपूर्ण लढतीमध्ये या नगर दक्षिणच्या लढतीचा समावेश आहे. पहिल्याच यादीत लंके यांचे नाव जाहीर झाल्याने नगरचा सामना देखील आता ठरला आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभेसाठीची पहिली यादी जाहीर केली. अहमदनगरमधून निलेश लंके, बारामतीतून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे, शिरूरमधून खासदार डॉ. अमोल कोल्हे, वर्ध्यातून अमर काळे तर दिंडोरीतून भास्कर भगरे यांचा यात समावेश आहे. सातारा, माढा, भिवंडी, बीड, रावेर या मतदारसंघातील उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत सामील झाल्याने नगर दक्षिणमधून लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या निलेश लंके यांची मोठी अडचण झाली होती. भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना फाईट देणारा तगडा उमेदवार म्हणून लंके यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र राज्यातील बदलत्या राजकीय अडचणीत सापडलेल्या लंके यांना आपल्या आमदारकीचा राजीनामा देत निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागत आहे. विखें विरोधात राष्ट्रवादीचा लंकेच्या रूपाने उमेदवार मैदानात उतरल्याने आता स्वपक्षीय व मित्र पक्षांच्या नाराजीने आधीच अडचणीत सापडलेल्या खासदार विखे यांच्या समोरील डोकेदुखी आणखी वाढली आहे.

बारामती व शिरूरमधून अपेक्षेप्रमाणे अनुक्रमे खासदार सुप्रिया सुळे व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन्ही मतदारसंघात महायुतीने अद्याप आपला उमेदवार जाहीर केला नसला तरी बारामतीत ननंद-भावजय आणि शिरूरमध्ये डॉ. अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील अशी लढत रंगण्याची चिन्हे आहे.

वर्ध्यातून अमर काळे यांना उमेदवारी देण्यात देण्यात आली आहे. येथून निलेश कराळे मास्तर निवडणूक लढण्यास इच्छुक होते. त्यांनी त्यासाठी वारंवार शरद पवार यांच्या भेटी घेत अखेरीस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश देखील केला. मात्र त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. त्यांच्या ऐवजी काळे यांना उमेदवारी देण्यात आली. याशिवाय दिंडोरीमधून भास्कर भगरे शरद पवार गटाचे उमेदवार असतील.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,140
डॉक्टर अमोल कोल्हे निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार लोकसभा निवडणूक शरद पवार सुप्रिया सुळे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By Annant Ppangarkar03/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या…

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.