Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

लोहारे येथील आवजीनाथ बाबा देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार; आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते २० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण

22/10/2026

आज गुरुवार, २२ ऑक्टोंबर — आजच्या दिवसाचे राशिभविष्य जाणून घ्या

22/10/2026

बाळासाहेब थोरातांचा राज्य सरकारला मोठा इशारा: ‘कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात तातडीने चारा छावण्या सुरू करा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल!’

21/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राजकारणाचा घसरलेला स्तर चिंताजनक! सामाजिक सौहार्द, एकोपा वाढीस लावण्यास अकोल्यात सर्वपक्षीय नेते-कार्यकर्ते एकवटले!
सामाजिक

राजकारणाचा घसरलेला स्तर चिंताजनक! सामाजिक सौहार्द, एकोपा वाढीस लावण्यास अकोल्यात सर्वपक्षीय नेते-कार्यकर्ते एकवटले!

अकोलेकरांनी उचलले कौतुकास्पद पाऊल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/05/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, दि. २१ मे

अकोले तालुक्याला मानवतावादी, उदात्त विचारांचा राजकीय-सामाजिक- सांस्कृतिक वैभवशाली वारसा लाभला असला तरी सध्या राजकारणाचा घसरलेला स्तर खूपच चिंताजनक असून यात तालुक्याचे नुकसान होत आहे. यात तातडीने सुधारणा होऊन सामाजिक सौहार्द टिकवून एकोप्याची भावना वाढीस लावण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम आखण्याची आणि त्याची सर्वांनी काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. सामाजिक सौहार्द, एकोप्याची भावना वाढीस लावण्यासाठी अकोल्यात सर्वपक्षीय नेते-कार्यकर्ते एकवटल्याचे सकारात्मक आणि आशादायी चित्र बघायला मिळाले.

यांची उपस्थिती… अकोले तालुक्यातील सामाजिक सौहार्द आणि राजकारणाचा घसरलेला स्तर याबाबत विचार विनिमय करण्यासाठी रविवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात विशेष बैठक झाली. ज्येष्ठ नेते दशरथ सावंत अध्यक्षस्थानी होते. आमदार डॉ. किरण लहामटे, अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर, ज्येष्ठ नेते मधुकर नवले, कारभारी उगले, मधुकर तळपाडे, किसान सभेचे सचिव डॉ. अजित नवले, सतीश भांगरे, बी. जे. देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी नेहे, राष्ट्र सेवा दलाचे विनय सावंत, वकील वसंत मनकर, अगस्ती पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे, सेनेचे महेश नवले, माकपचे सदाशिव साबळे, माधव तिटमे, मंदाबाई नवले, लक्ष्मण नवले, संदीप दराडे, गणेश कानवडे, ओंकार नवाळी या राजकीय पक्षांच्या नेत्यांसह ज्येष्ठ पत्रकार-लेखक शांताराम गजे, शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते भाऊसाहेब चासकर, शाहीन फारुकी, डॉ. संदीप कडलग आदी सामाजिक क्षेत्रात सक्रीय असलेले कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते.

यांनी चर्चेला तोंड फोडले… कम्युनिस्ट पक्षाचे कारभारी उगले यांनी बैठकीच्या सुरुवातीला प्रास्ताविकाच्या भाषणातून चर्चेला तोंड फोडले. त्यानंतर सर्व वक्त्यांनी घसरलेल्या राजकीय स्तराबाबत चिंतेचा सूर लावला. एकोपा वाढीस लावण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज प्रतिपादन केली. तालुक्यात भविष्यातही राजकारण व समाजकारण विचारांच्याच आधारे होणे गरजेचे आहे. विचारांची लढाई विचारांनीच लढली जावी. वेगळे मत मांडण्याचे इतरांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले जावे. वेगळे मत म्हणजे विरोधीच मत असे सरसकट मानले जाऊ नये.

यावर झाला विचार… वैयक्तिक आकस, सुडबुध्दी, थेट संपविण्याचीच भाषा, मारामारी, खोट्या केसेस, बेछूट आरोप, वैयक्तिक निंदानालस्ती हे सर्वथा गैर असून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर काहीही असो निदान अकोले तालुक्यात तरी असले गलिच्छ राजकारण नकोच अशा भावना अकोले तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या. तरूण पिढीला व्यसनाधीन बनवून त्यांची माथी भडकविणे, त्यांना वाममार्गाला लावणे, विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवणे, कोर्टकचेरी मागे लावून तरुणांचे करीअर बरबाद करणे यासारखे सर्वंच गैरप्रकार टाळणे ही तालुक्यातील सर्वच राजकीय, सामाजिक कार्यकर्ते यांची जबाबदारी आहे अशा शब्दांत सर्वच वक्त्यांनी मनातली खदखद व्यक्त केली. विचारांची लढाई विचारांनीच लढायला हवी. नव्या पिढीच्या हाती समृद्ध सांस्कृतिक वैचारिक वारसा जपणारा अकोले तालुका सोपवण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन करावे, अंकुश ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यूट्यूब चॅनलने आचारसंहिता निश्चित करावी… युट्यूब चॅनेल्सच्या पत्रकारांनी स्वतःच आचारसंहिता निश्चित करण्याची आवश्यकता व्यक्त झाली. व्यक्तिगत स्वार्थाकरता केले जाणारे बिनबुडाचे बेछूट आरोप असोत किंवा वैयक्तिक निंदानालस्ती करण्याचा प्रयत्न याबाबत युट्यूब चॅनलनी भूमिका ठरवली पाहिजे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी हे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे याबाबत उपस्थित सर्वांचे एकमत झाले.

हे झाले निर्णय… सामाजिक सौहार्द आणि समाजात एकोप्याची भावना वाढीस लावण्यासाठी विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्याचा निर्णय झाला. व्याख्यानमाला सुरू करणे, प्रशासकीय यंत्रणेवर जनांकुश निर्माण करणे, सोशल मीडियाचा गैरवापर करून जातीय धार्मिक तेढ निर्माण करून सामाजिक सलोखा धोक्यात आणणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींनी सामाजिक समस्यांवर प्रबोधन करण्याची आवश्यकता असल्याचे मत सर्वपक्षीय नेत्यांनी बैठकीत नोंदवले.

Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,023
अकोले डॉक्टर अजित नवले सामाजिक सलोखा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

लोहारे येथील आवजीनाथ बाबा देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार; आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते २० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण

By Annant Ppangarkar22/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील लोहारे येथील जागृत आणि सर्व समाजासाठी प्रेरणास्थान असलेल्या श्री…

आज गुरुवार, २२ ऑक्टोंबर — आजच्या दिवसाचे राशिभविष्य जाणून घ्या

22/10/2026

बाळासाहेब थोरातांचा राज्य सरकारला मोठा इशारा: ‘कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात तातडीने चारा छावण्या सुरू करा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल!’

21/10/2026

संगमनेरमध्ये जनसागर! ३६ फुटी रावणदहन अन् हजारो झाडांचे वाटप; मालपाणी इंडस्ट्रियल पार्कमध्ये ‘सीमोल्लंघन’चा उत्साह

21/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.