Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा, पथकाने श्वास क्लिनिक केले सील!
गुन्हेगारी

बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा, पथकाने श्वास क्लिनिक केले सील!

वैद्यकीय व्यवसायाचे परवानगी नव्हती
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 6, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार दिनांक ६ जून २०२४

बोगस डॉक्टरविरुद्ध केलेल्या तक्रारीची दखल घेत तालुका आरोग्य अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकत श्रीरामपूरमध्ये कारवाई केली. कथित डॉक्टर बोगस असल्याचे उघड झाल्यानंतर त्याचा दवाखाना सील करण्यात आला आहे.

सागर अहिरे असे या बोगस डॉक्टरचे नाव असेल श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथे त्याचा दवाखाना सुरू होता. या डॉक्टर विरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोंधवणी (श्रीरामपूर) येथील अरुण माणिक शिंदे यांनी हा डॉक्टर बोगस असल्याबद्दल तक्रार केली होती.

या तक्रारीची दखल घेऊन गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे व वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी माळेवाडीचे समुदाय आरोग्य अधिकारी संदीप माने, आरोग्य सेवक उपकेंद्र नुरमहमंद पटेल, आशा स्वयंसेविका अर्चना मोहन, सुशीला काळे यांच्या पथकासह माळेवाडी येथील श्वास क्लिनिक या दवाखान्यावर बुधवारी छापा टाकला.

याठिकाणी अॅलोपॅथीची औषधे, इंजेक्शन, सलाईनच्या बाटल्या, तपासणी टेबल, वाफेचे मशीन आदी साहित्य आढळून आले. तसेच आहिरे हा कुठलीही वैद्यकीय पदवीधारक नसल्याचे आढळून आले. त्याने बीएचएमएसच्या चौथ्या वर्षाची हिवाळी-२०२३ परीक्षा दिली असून त्यात तो अनुत्तीर्ण झाला आहे.

त्याच्याकडे कोणतीही शासनमान्य मेडिकल कौन्सिलची व्यवसाय पदवी नसल्याचा अभिप्राय त्याने शिक्षण घेतलेल्या वैद्यकीय महाविद्यालयातून मिळाला. त्यास वैद्यकीय व्यवसाय करण्याची परवानगी नाही. कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना अनधिकृतपणे रुग्ण तपासणे हा गुन्हा आहे.

त्यामुळे उंदिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सुनील राजगुरू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advt
anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,108
बोगस डॉक्टर श्रीरामपूर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026

सहा मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जण ताब्यात

June 4, 2026

संगमनेरमध्ये बुलेटच्या सायलेन्सरमधून मोठे आवाज काढणाऱ्या तरुणावर पोलिसांची कारवाई, दुचाकी जप्त

June 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

By अनंत पांगारकरJune 4, 20260

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी मोठ्या राजकीय…

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026

सहा मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जण ताब्यात

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.